महाआघाडी नव्हे महागुंडा सरकार..भाजप नेते संतप्त..

बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून भाजपचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Shivsena30.jpg
Shivsena30.jpg

मुंबई : बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर हा प्रकार घडला आहे. यावर या व्हिडीओवर शिवसेनेला विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून भाजपचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ टि्वट करीत त्यांनी महाविकास सरकारला महा गुंडा सरकार म्हटलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये राम कदम म्हणतात, "हे महा आघाड़ी सरकार आहे की महा गुंडा़ सरकार ? शिवसेनेचे लोग रिव्हॉल्वर दाखवून लोकांना धमकावत आहेत. कधी पर्यंत ही यांची दादागिरी सहन करायची ? बस्स आता खूप झाले.."

हाच व्हिडीओ शेअर करत, भाजपाचे नेते निलेश राणे यांनी "शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?, असा प्रश्न विचारला आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी केली आहे.  
 
“चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?,” असं निलेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटल आहे.  

जलील यांनी व्हिडीओ ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांच्या कारवर असणारा लोगोच सर्वकाही सांगत असल्याची बाब इथं अधोरेखित केली. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक या घटनेची दखल घेणार का, असा प्रश्न त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत उपस्थित केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com