पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."  - Politics Sharad Pawar support for Jayant Patil Chief Minister post | Politics Marathi News - Sarkarnama

पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.." 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

शरद पवार म्हणाले, "जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, त्यांना शुभेच्छा...मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.." 

कोल्हापर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, असी इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना माझा पाठींबा आहे, असे व्यक्तव्य केले होते. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार यांनी यावर मिश्लिल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, त्यांना शुभेच्छा...मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.." 

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर आपल्याला काय वाटत? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, जयंत पाटील यांना माझा पाठींबा आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

जयंत पाटील काय म्हणाले होते?

पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. का, असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल.

एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली होती. 

तसेच मला मुख्यमंत्रीपदा पेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावते, अशी भावनाही जयंत पाटलांनी केली यावेळी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आमदारांची संख्या सर्वाधिक असलेल्या शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आलेल आहे. पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्या नंतर राजकीय वर्तुळात आता, चर्चा रंगू लागली आहे. की, शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद हे अडीच वर्षासाठी आहे, की पाच वर्षासाठी आहे. याचे स्पष्टीकरण येत नाही, तो पर्यंत उद्धव ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्नच आहे. 
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख