पवार, ठाकरे, फडणवीस आज एकत्र येणार..

उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आज सांयकाळी एकत्र जमणार आहेत. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
purvashi31.jpg
purvashi31.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते आज सांयकाळी एकत्र जमणार आहेत. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा आज साखरपुडा आहे, यानिमित्ताने राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा सांयकाळी 7 वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. चित्रपट क्षेत्रातील काही कलाकारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.  

पूर्वशी राऊत यांच्या साखरपुड्याची छापलेली गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिकाही सर्वांचे लक्षवेधून घेणारी आहे. पत्रिकेवर ‘पीएम’ असा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. पूर्वशी यांच्या नावातील अद्याअक्षर असलेलं ‘पी’ आणि मल्हार यांच्या नावातील ‘एम’ हे अद्याक्षर घेऊन ‘पीएम’ असा ठळक उल्लेख करण्यात आला आहे.    

राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी 2018मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे उच्च शिक्षित, व्यावसायिक आहेत. पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित आहेत. त्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. 
 
हेही वाचा : सवदी म्हणाले....खुर्ची टिकवण्यासाठी ठाकरेंकडून सीमा प्रश्नाचा आधार
बंगळूर  : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सीमाप्रश्नावर मनमानी वक्तव्य करणे सुरूच ठेवले आहे. शनिवारी मंगळूर येथे बोलताना बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक असल्याची दर्पोक्ती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपली खुर्ची टिकविण्यासाठी बेळगाव, कारवारचा प्रश्न उपस्थित करीत असल्याचा अजब दावा केला. सवदी यांनी असा आरोप केला की, महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीत भांडणे सुरू आहेत आणि म्हणूनच लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ठाकरे यांनी सीमाप्रश्नावर वक्तव्य करून बेळगाव, कारवार आणि निपाणी हे भाग महाराष्ट्राचे असल्याचा दावा केला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. आम्ही आधीच बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले आहे. आम्ही तेथे दरवर्षी विधिमंडळ अधिवेशन घेत आहोत. या सर्व गोष्टींची जाणीव असूनही ते केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी अशी विधाने करीत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com