संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन चुकीचेच.. मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत... - Politics Sanjay Rathord show of strength is wrong  CM will not forgive Vinayak Raut | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन चुकीचेच.. मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

13 आँडिओ क्‍लिपची चौकशी करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार चौकशी होईल.

रत्नागिरी : "संजय राठोड प्रकरणी चौकशीत दोषींवर नक्कीच कारवाई होईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील. सर्वांना समान न्याय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. पोहरादेवीवर केलले शक्तीप्रदर्शन कोरोना काळात करणे चुकीचे होते," असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. 

विदर्भात कोरोना वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी तिथे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी जमणे आणि जमवणे योग्य नाही, असा खुलासा शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केला.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते.  

राऊत म्हणाले, "या प्रकरणात कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यातून कोणीही सुटणार नाही. 13 आँडिओ क्‍लिपची चौकशी करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार चौकशी होईल. संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री नाराज आहेत, या प्रश्‍नावर बोलताना राऊत म्हणाले, याबाबत मला काही माहित नाही.

संजय राठोड प्रकरणात महाविकास आघाडीमध्ये खदखद नाही. जो कोण चुकला असेल, त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत. संजय राठोड प्रकरणात भाजपचे आरोप चुकीचे आहेत. आरोप करण्यापलिकडे भाजपकडे काही उरले नाही. 

संजय राठोड प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होणार आहे. चित्रा वाघ यांनी आरोप करताना मुख्यमंत्र्याचे कौतुक केले आहे. या घटनेची पूर्ण दखल मुख्यमंत्र्यांनी गांर्भीयाने घेतली आहे, असे स्पष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी दिले. भाजप आक्रस्ताळेपणा करून नाव गोवण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय दबावाला बळी पडून कोणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांनी करणं योग्य नाही, असा मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाचा भाजप सोडून शिवसंग्राममध्ये प्रवेश  

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी समाजाचे कार्य प्रभावीपणे करता यावे, यासाठी भारतीय जनता पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम या मराठा संघटनेत नुकताच प्रवेश केला आहे. घाग यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठीची मोठी आंदोलने व प्रशासनासोबत चर्चा यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाजपमध्ये जिल्हा पदाधिकारी असलेले राजन घाग यांनी नुकताच आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा राजीनामा देऊन शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख