मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचं आयोजन सध्या राज्यभरात करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यात दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी टि्वटवरून दिली आहे.
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो," असे टि्वट जयंत पाटील यांनी केलं आहे.
खेड तालुक्यात कोरोनाच्या संसर्गासोबतच लग्नसोहळ्यातील गर्दीही वाढली... https://t.co/crUp6OD0p8
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 17, 2021
जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली होती.
हेही वाचा 'डीसीसी'च्या तत्कालिन संचालकांचा फैसला सहकार मंत्र्यांच्या हातात...
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे तत्कालिन चेअरमन माजी आमदार दिलीप माने यांच्या कालावधीत संचालक मंडळाची सहकार कायदा कलम 83 व कलम 88 अन्वये चौकशी सुरु आहे. चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले तत्कालिन जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांच्या नियुक्तीवर उच्च न्यायालयाने काल महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. लावंड यांच्या नियुक्तीचे मुद्दे 12 आठवड्यात पडताळून घेण्याचे निर्देश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले आहेत. लावंड यांच्या नियुक्तीचा पर्यायाने संचालक मंडळाच्या चौकशीचा फैसला आता सहकारमंत्री पाटील यांच्या हातात आहे.
सहकारमंत्री पाटील यांनी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सर्व पक्षकारांना त्यांच्या दालनात उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. तत्कालिन जिल्हा उपनिबंध व चौकशी अधिकारी लावंड हे देखील जिल्हा बॅंकेचे पदसिध्द संचालक होते.

