'तुम्ही गद्दारी करून गेलात..' जितेंद्र आव्हाडांचा नाईकांना टोला (पाहा व्हिडिओ) - Politics NCP leader Jitendra Awhad criticizes MLA Ganesh Naik | Politics Marathi News - Sarkarnama

'तुम्ही गद्दारी करून गेलात..' जितेंद्र आव्हाडांचा नाईकांना टोला (पाहा व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गणेश नाईकांनी महाविकास आघाडीवर आपला रोष व्यक्त केला आहे. 

मुंबई : पन्नास नगरसेवकांसह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदार गणेश नाईकांना राज्यातील सत्तांतराचा मोठा फटका बसत आहे. आतापर्यंत त्यांच्या सोबत गेलेल्या 14 नगरसेवकांनी पुन्हा महाविकास आघाडीत घरवापसी केली आहे. यामुळे संतापलेल्या गणेश नाईकांनी महाविकास आघाडीवर आपला रोष व्यक्त केला आहे. 

"तुम्ही आमचे 8 फोडले तर आम्ही तुमचे 16 फोडू आणि जेव्हा मी एखादी गोष्ट डोक्यात आणतो तेव्हा ती गोष्ट केल्याशिवाय राहत नाही," असा दमच आमदार गणेश नाईकांनी विरोधकांना भरला आहे.

गणेश नाईक यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, फुटताना कोणी दिसत नसून गळताना दिसत आहे. जे घेऊन गेले ते आमचे होते, तुम्ही गद्दारी करून घेऊन गेलात. 

राणेंमध्ये उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत नाही
 
सिंधुदुर्ग : ''नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आज तरी राहीलेली नाही. त्यांनी कितीही गिफ्ट देऊ केली तरी शिवसेनेला त्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मनाचा मोठेपणा किती आहे तो दाखवून दिला. तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली तरी तुमच्या मेडीकल काॅलेजचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केला., दुसऱ्या कोणी केला नाही. त्यामुळे नितेश राणेंकडून गिफ्ट स्विकारण्याची वेळ शिवसेनेवर आज तरी आलेली नाही. माञ नितेश राणे यांच्यावर ती वेळ लवकरच येणार आहे,'' असा हल्लाबोल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. 

''वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही. शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नेय, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय'' असे काल नितेश राणे म्हणाले होते. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख