आंदोलक यूवक शेतकऱ्यांचे एन्कांऊटर केले का.. राऊतांचा सवाल - Politics mp sanjay raut in parliament have you encountered 100 youth who are untraced since republic day violence | Politics Marathi News - Sarkarnama

आंदोलक यूवक शेतकऱ्यांचे एन्कांऊटर केले का.. राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

तिरंग्याचा अपमान करणारा दीप सिद्धू हो कोणाचा व्यक्ती आहे, हे सरकार का सांगत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.  

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर टीका केली. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत. हे देशाच्या प्रतिष्ठेसाठी अयोग्य आहे, असे राऊत यांनी सांगितले.

लाल किल्ल्यावर तिंरग्यांचा अपमान होतो, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुःखी होतात, पण तिरंग्याचा अपमान करणारा दीप सिद्धू हो कोणाचा व्यक्ती आहे, हे सरकार का सांगत नाही. त्याला सरकारने आतापर्यंत का अटक केली नाही. आंदोलक करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार कारागृहात बंद केले आहे. या आंदोलनातील शंभर पेक्षा अधिक युवक बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे एन्कांऊटर केले आहे का, कारण त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. हे सर्व आंदोलक देशद्रोही आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अहंकारामुळे बहुमत सिद्ध होत नाही, असेही ते म्हणाले.
 
संजय राऊत म्हणाले की दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहचत नाही. त्यांना देशद्रोही म्हटले जाते. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमा रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. भारत-चीन सीमेवर जर असे केले असते तर चीनी सैन्य आपल्या हद्दीत शिरले नसते. आज शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आहे. त्याला खालिस्तानी, देशदोही समजले जाते. हा कोणता न्याय आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेससेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदार काल गाजीपूर सीमेवर, शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र, त्याना गाजीपूर सीमेवर अडवले. आंदोलनस्थळावर जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले.  सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॅार्डवर शेतकर्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवण्यात आले. 

शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी देशातील विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार एकत्र आले होते. सर्व खासदारांनी मिळून आंदोलनस्थळी जाण्यासाठी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे सर्व खासदार आंदोलकांना न भेटताच परले आहेत. 

सुप्रिया सुळे यांनी गाझीपूर सीमेला भेट दिल्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, गाझीपूर बॉर्डर, दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख