सत्ता आल्यानंतर शिवसेनेचा जनतेशी संबंध तुटला... - politics jalgaon MLA Suresh Bhole criticizes Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ता आल्यानंतर शिवसेनेचा जनतेशी संबंध तुटला...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

शिवसेनेच्या या बदलाचा भाजपवर कोणताही फरक पडणार नाही, असे आमदार भोळे म्हणाले.

जळगाव : राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना Shiv Sena जनतेपासून दूर जात आहे, जळगाव जिल्ह्यात ही अशीच स्थिती आहे. त्यामुळे आता त्यांना जनतेच्या जवळ जाण्यासाठी जिल्ह्यात अधक्षपदाचा भडिमार करण्यात येत आहे,  मात्र जनता त्यांच्यासोबत जाणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे Suresh Bhole यानी केली आहे. politics jalgaon MLA Suresh Bhole criticizes Shiv Sena

शिवसेनेने जळगाव जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकारी पदाची भाकरी फिरवली आहे. त्यांनी आता जिल्ह्यात तीन विधानसभा निहाय एक अध्यक्ष नियुक्त केले आहेत. यामुळे आगामी शिवसेनेला जिल्ह्यात बळ मिळेल, असा विश्वास आहे. तसेच हे भाजपला आव्हान मानले जात आहे.

शिवसेनेच्या या बदलाबाबत आमदार सुरेश भोळे म्हणाले, "पक्ष जेव्हा कमकुवत होतो, नेत्यांचा जनतेशी संवाद संपलेला असतो, त्यावेळी हे बदल केले जातात, जळगाव जिल्ह्यात आज शिवसेनेची तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच त्यांनी चार जिल्हा अध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता आल्यानंतर शिवसेनेचा जनतेशी संबंध तुटला आहे. हेच यावरून दिसून येत आहे. भारतीय जनता पक्ष जनतेच्या मनात आहे, त्यामुळे सत्ता असो किंवा नसो आम्ही नेहमी जनतेसोबत असतो, त्यामुळे शिवसेनेच्या या बदलाचा भारतीय जनता पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, उलट आगामी काळात पक्ष आणखी भरारी घेईल.
 
ते आमच्यात रुळले नाहीत
महापालिकेच्या भाजपतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबत बोलताना आमदार भोळे म्हणाले, ते आमच्या पक्षात आले परंतु ते रुळले नाहीत, ते आमचे नव्हते त्यामुळे ते गेले. त्यांच्यामुळे पक्षाचे काहीही नुकसान झाले नाही.

राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. मराठवाडा मिळालेल्या यशाचा पॅटर्न आता खानदेशात राबविण्यात येत आहे. तीन विधानसभा क्षेत्रासाठी एक जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात येत आहे. जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना एके काळी खानदेशात बळकट होती. याच शिवसेनेचा बोट धरून भाजप खानदेशात वाढली, परंतु शिवसेना फारशी वाढली नाही. परंतु आता खानदेशात शिवसेनेने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यात शिवसेनेने तीन विधानसभा क्षेत्रासाठी एक जिल्हाप्रमुख नियुक्त केला होता. त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत चांगले यश मिळाले होते. आता खानदेशात हा पॅटर्न  राबविण्यात येत आहे.

 Edited by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख