मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटलं..  "बलात्काराच्या घटनांना कोरोना जबाबदार " - Politics ignited from the statement of the Chief Minister Corona is responsible for the incidents of rape | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटलं..  "बलात्काराच्या घटनांना कोरोना जबाबदार "

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

"राज्यात बलात्काराच्या वाढत असलेल्या घटनांना कोरोनाचे संकट जबाबदार आहे," असे मुख्यमंत्री सोरेन यांनी शनिवारी म्हटलं होते. या विधानावरून आता राजकारण पेटले आहे. 

रांची : झारखंडचे भाजप प्रदेशाअध्यक्ष आणि खासदार दीपक प्रकाश यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानावर निशाना साधला आहे. "राज्यात बलात्काराच्या वाढत असलेल्या घटनांना कोरोनाचे संकट जबाबदार आहे," असे मुख्यमंत्री सोरेन यांनी शनिवारी म्हटलं होते. या विधानावरून आता राजकारण पेटले आहे. 

मुख्यमंत्री सोरेन यांच्या या विधानानंतर खासदार दीपक प्रकाश यांनी सांगितले की मुख्य़मंत्री सोरेन यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे, त्यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या घटनांना कोरोनाला जबाबदार धरले आहे. सरकारचे अपयश व आगामी पोटनिवडणूक महाआघाडीचा होणार पराभव लक्षात घेता मुख्यमंत्री असे उलट-सुलट विधाने करीत आहेत. मुख्यमंत्री नागरिकांच्या प्रश्नांना घाबरत आहेत. 

झारखंड येथे बलाकार व अन्य गुन्हेगारी घटनांबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की कोरोना काळात अनेक गोष्टीमध्ये बदल झाले. पावसाच्या वेळेस ऊन आणि उन्हाळ्यात पाऊस होत आहे. नागरिकांची मनोवृत्तीत बदल होत आहेत. ते विचित्रपणे वागत आहेत. याचा परिणाम बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटना नातेवाईक, मित्र, घरगुती भांडण, जमीन व्यवहार यांच्याशी संबधीत होत आहे. 
 

हेही वाचा : बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल : पृथ्वीराज चव्हाण
 

कऱ्हाड : बिहारमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी असून नितीशकुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे. भाजपने मित्रपक्ष रामविलास पासवान यांना नितीशकुमार यांना विरोध करायला सांगितले आहे. त्यामुळे भाजपची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे वातारवण तयार केले आहे. लालुप्रसाद यादव यांना बरेच दिवस तुरुगांत ठेवल्याने त्यांच्याबद्दल सहानुभुती आहे. नव्या पिढीचे युवक बाहेर निघाले असल्याने बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आमदार चव्हाण म्हणाले, बिहारची निवडणुक सुरु आहे. भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात बिहारमध्ये फुकट कोरोनाची लस देऊ असे जाहीर केले. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. बिहारपुरते असे केंद्र सरकारला करता येणार नाही. केवळ राजकारणासाठी, मते मिळवण्यासाठी लस देणे निषेधार्य आहे. त्याची निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांना सर्वच राज्यांना लस द्यावी लागेल. कोरोनाच्या महामारीचे त्यांनी राजकारण करु नये, असे आमचे म्हणणे आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख