काँग्रेस नेत्याचा भाचा शिवसेनेत..भाजपला धक्का 

मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
samir desai27f.jpg
samir desai27f.jpg

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी उरला असताना शिवसेनेत आता इनकमिंग सुरु झाली आहे. मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे समीर देसाई हे भाचे आहेत. 

 
भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाई यांनी 2014 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यांना भाजप प्रदेश सचिव पद देण्यात आले होते. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

समीर देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली. समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते.

 
राष्ट्रवादीला मोठा धक्का..धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये...
अकलूज : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डाँ धवलसिंह मोहिते पाटील उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॅाग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या  या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले डाँ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधान सभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार ही केला होता.परंतु राष्ट्रवादीने पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुंबईत टिळक भवनात काॅग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटिलसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
 Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com