खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे.. - politics digvijaya singh attacks pm narendra modi says he must get nobel prize | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप झाली तर त्यामध्ये मोदींना सुवर्णपदक मिळेल.

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०१२ मध्ये मासेमारी करणाऱ्या दोन जणांना केरळच्या किनाऱ्यावर मारुन टाकल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर करण्यात आला होता. या प्रकरणाची चैाकशी सुप्रीम कोर्टात सुरु होती. ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टनं नुकताच घेतला आहे. इटलीच्या कायद्यानुसार आता त्याच देशात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. politics digvijaya singh attacks pm narendra modi says he must get nobel prize  

हा खटला बंद करण्याच्या निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट करीत मोदींवर टीका केली आहे.  "खोटं बोलण्यासाठी नरेंद्र मोदींना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, " असा टोला दिग्विजय सिंह यांनी मोदींना लगावला आहे. 

पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींनी या प्रकरणाची कारवाई सैाम्यपद्धतीने सुरु असल्याची टीका सोनिया गांधींवर केली होती, मोदी म्हणाले होते की, "मॅडम, या इटालीयन खलाशांना कोणत्या कारागृहात टाकणार.." सुप्रीम कोर्टनं नुकत्याच दिलेल्या निकालानंतर मोदी सरकारनं मैान बाळगल्याने कॅाग्रेसने मोदींवर हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे. या प्रकरणावरील मोदींचे जुने टि्वट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका नेटकऱ्यांनं मोदीचं जुनं टि्वट रिटि्वट केलं आहे. यावर दिग्विजय सिंह यांनी टीका करत मोदींना लक्ष केलं आहे. 

एका व्यक्तीच्या टि्वटला उत्तर देतांना दिग्विजय सिंह म्हणतात की, मी सहमत आहे. खोटे बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप झाली तर त्यामध्ये मोदींना सुवर्णपदक मिळेल, त्यांना हरवणं अशक्य आहे. 

"टेलीमेडिसीन" ठरली 'संजीवनी'.. रुटीन हेल्थ केअरकडे पुन्हा वळा..  
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेच्या प्रलयाचा धडा घेऊन दूरसंचार तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य सुविधा ग्रामीण-दुर्गम भागांपर्यंत सर्वदूर पोहोचविणे आणि ई संजीवनी सारख्या टेलीमेडिसीन योजनांचा वेगवान प्रसार करणे ही काळाची गरज आहे, असे सैन्यदलांच्या कोरोना विशेष कृती गटाचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी  'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख