नापास विद्यार्थी सरकार चालवित आहे...फडणवीसांचा टोला  - Politics Devendra Fadnavis attack on Mahavikas Aghadi government Bhagat SinghKoshnyari | Politics Marathi News - Sarkarnama

नापास विद्यार्थी सरकार चालवित आहे...फडणवीसांचा टोला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

मुंबई : यूपीए सरकार राज्यपालांवर टीका करते मात्र, ज्या मंत्र्यांना राज्यपाल आणि शपथ दिली त्यांनी टीका करू नये ते निषेधार्ह असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भाईंदर येथील स्वर्गीय प्रमोद महाजन कला दालनाच्या भूमिपूजन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की नापास विद्यार्थी सरकार चालवित आहे.  राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपालपदी योग्य व्यक्ती बसली नाही, असे चुकून बोलल्या असतील. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे संकेत सातत्याने पाळले जात नाहीत.

विधान परिषदेच्या बारा आमदारांची नावे देवून अनेक दिवस झाले, तरीही यावर निर्णय नाही, त्यामुळे सत्तारूढ आणि राज्यपाल असा वाद तयार होतो. घटनेनुसार काम केले, तर असे शब्द जाणार नाहीत, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यशोमती ठाकूर यांची पाठराखण केली. 

मुश्रीफ म्हणाले, "वास्तविक राज्यपालांना त्यांचे पद मिळाले आहे. त्यांना त्यांचा मानसन्मान मिळाला. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशियार यांनीही घटनेनुसार काम केले तर त्यांच्याबद्दल असे शब्द जाणार नाहीत.'' 

पेट्रोल दरवाढीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शतक ठोकले आहे. पेट्रोल शंभरी पार करेल, अशी परिस्थिती आहे. डिझेल आणि गॅस दरातही प्रचंड वाढ केली आहे. यामुळे शिवसेनेने राज्यभर आंदोलन केले आहे. राष्ट्रवादीसुद्धा इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. इंधन दरवाढीबद्दल बोलण्यासाठी भाजपकडे कोणत्याही मुद्दा नाही. त्यामुळेच ते वीज दरवाढीचे आंदोलन करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार हे यावर तोडगा काढतील. ज्या-ज्या वेळी असे प्रश्‍न तयार होता. त्या-त्यावेळी मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी पुढे असते. त्यामुळे यावरही निर्णय लवकरच होईल. असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख