'तुम्हाला खरंच महिलाबाबत सन्मान आहे का..' चंद्रकांतदादाचा देशमुखांना सवाल...

अनिल देशमुख यांनी याबाबत केलेल्या टि्वटवर भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
cp28f.jpg
cp28f.jpg

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. यावर आता राजकारण पेटलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत केलेल्या टि्वटवर भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकुर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता." असे टि्वट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला. ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजच्या खासदार म्हणून निवडूण आल्या आहेत. भाजपच्या बेवसाईटवर त्यांची ओळख वाईट शब्दात करण्यात आल्याचे स्क्रीनशॅाट समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबधितावर कारवाईचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. याविषयी देशमुख यांनी टि्वट केलं आहे. 

"भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा पुढील कारवाई करेल," असे टि्वट अनिल देशमुख यांनी केलं आहे. 
 
पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी स्क्रीनशॉट जोडत एक ट्वीट केलं आहे. भाजपची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात  खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच गे समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना या ट्वीटमध्ये टॅग केले आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट करून हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. माहितीनुसार (Raver) रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com