rpnr25.jpg
rpnr25.jpg

पवारांची कंपनीच करार शेती करण्याचे फायदे सांगते...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून महाविकास आघाडीतर्फे मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. 

करार पद्धतीने शेती करण्याच्या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तर रोहित पवार यांच्या मालकीची कंपनीच करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे सांगते, असे सांगत निलेश राणे यांनी रोहित पवारांना टोला हाणला आहे. रोहित पवार यांच्या कंपनीचा फलक राणेंनी टि्वट केला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये रोहित पवार म्हणतात, "नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत."

शेतकऱ्यांचा मोर्चा आज राजभवनावर धडकणार.. .
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून महाविकास आघाडीतर्फे मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.  

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  तीन दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहे.  .  

नवाब मलिक म्हणाले, "विविध संघटनांतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आज आझाद मैदान ते राजभवनपर्यंत मोर्चोचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते या वेळी उपस्थित राहणार आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचा शेतकरी कायद्याला विरोध आहे." 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com