"टँपिंग अहवाल लवंगी फटाका की अँटम बाँम्ब हे लवकरच कळेल.." फडणवीसांचा राऊतांना टोला

25 ऑगस्ट 2020 पासून हा अहवाल दाबून का ठेवला,” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.
3Sarkarnama_20Banner_20_2810_29_5.jpg
3Sarkarnama_20Banner_20_2810_29_5.jpg

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत म्हणाले, "फोन टँपिंग अहवाल म्हणजे लवंगी फटाका आहे. फोन टँपिंग अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किमंत नाही," असे राऊत म्हणाले.

आज भाजपचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. त्यानंतर पत्रकारांनी या अहवालावर राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काल जो अहवाल दिला तो लवंगी फटाका होता की मोठा अँटम बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? 25 ऑगस्ट 2020 पासून हा अहवाल दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला,” असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

फडणवीस म्हणाले की, या अहवालात कुणाचे चेहरे लिप्त आहेत हे लवकरच बाहेर येईल, कोणाला कसा हप्ता जात होता, हे लवकरच उघड होईल. या हप्ता वसुलीत आघाडी सरकारमधील सगळेत समाविष्ठ आहेत. आम्ही राज्यपालांकडे गेलो तर राऊत म्हणतात 'राज्यपालांना भाजपचे नेता भेटले.' जेव्हा राऊत राज्यपालांना कमरेपासून नमस्कार घालतात, तेव्हा ते कोणाचे नेते असतात. परमबीर सिंग यांच्या पत्राबाबत सरकारमधील कोणीच बोलत नाही. संजय राऊत याबाबत बोलत असतात. राऊत हे सरकारचे अधिकृत व्यक्ती नाही. कोणी पोलिस अधिकारी सत्य बोलत असेल तर तो भाजपचा एजंट, हप्ता वसूल करून देत असेल, तर तो शिवसेनेचा एजंट. महाराष्ट्राच्या हितासाठी मी हा विषय बाहेर काढला आहे, महाराष्ट्राची बदनामी होत असेल तर मी असे विषय बाहेर काढणारच, माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मी घाबरत नाही, न्यायालयात मी सत्य बाहेर आणेल. 
 
 भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेत त्यांना राज्यात मागील काही दिवसांत घडलेल्या सुमारे १०० घटनांची माहिती दिली. तसेच या घटनांमध्ये राज्य सरकारने संविधानिक जबाबदारीचे पालन केले नाही. या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे मौन हे अधिक चिंताजनक आहे. त्यामुळेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून या घटनांबाबत माहिती घेऊन त्यांना बोलतं केलं पाहिजे. या घटनांवर काय कारवाई केली, याचा अहवाल त्यांच्याकडून घ्यावा, अशी मागणीही भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, ज्याप्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येत आहेत, अशा १०० घटना राज्यपालांच्या लक्षात आणून दिली. सरकारने संविधानिक जबाबदारीचे पालन केलेले नाही. या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे मौन हे चिंताजनक आहे. ते एक शब्दही बोलत नाही. राज्यात काँग्रेस अस्तित्वहीन दिसत आहे. त्यांचे नेते दिल्लीत वेगळे आणि इथे वेगळे बोलतात. 

(Edited  by :  Mangesh Mahale) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com