शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी.. - Politics bjp leader atul bhatkhalkar Criticized sharad pawar uddhav-thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

एका पोलिस अधिकाऱ्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावरून भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्यानंतर राजकारण पेटले आहे. भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे. काल एका पोलिस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावरून भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 

अतुल भातखळकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी. पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे.''

 
काल शरद पवार यांनी सांगितले होते की, ''मुंडे हे काल मला भेटले होते. त्यांनी मला सविस्तर मला माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबध होते. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्याची चैाकशी सुरू आहे. आपल्यावर व्यक्तीगत हल्ले होऊ शकतात, म्हणून मूंडे यांनी याबाबत भूमिका घेऊन न्यायालयात गेले होते. न्यायालयाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे याबाबत भाष्य करणं चुकीचं आहे. मुंडेंनी सांगितलेली माहिती अन्य मंत्र्यांना सांगणार आहे. मी माझ्या सहकार्यासोबत चर्चा करणार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.''

जयंत पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांना अनेक वर्षापासून  ब्लॅकमेल केलं जात होत. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नाही. या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर तसेच पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.  

हेही वाचा : मुंडे यांचा राजीनामा नाही..राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय... 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बोलविण्यात आलेली बैठक तीन तास चालली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  सुप्रिया सुळे,  राजेश टोपे, अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक चालली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या बाबत चर्चा करण्यात आली धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे विचारपूर्वक आणि जाणून बुजून पद्धतीने करण्यात आले, शिवाय भाजपच्या एका नेत्याने त्या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण म्हणजे ब्लॅकमेलिंग असावं, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं, शिवाय या प्रकरणातील काहीच निर्णय नसेल पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा अशी मागणीही करण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख