भाजपचे चॉकलेट आंदोलन... - Politics BJP chocolate agitation against Mahavikas Aghadi government  Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे चॉकलेट आंदोलन...

संजय जाधव
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

नागरिकांना चॉकलेट वाटून सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली.

बुलढाणा : कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोडव्याने केली जाते, असे नेहमीच म्हटले जाते. तर नात्यामधील गोडवा सर्व कटुता दूर करण्यास मदत करतो. यामुळे काल चॉकलेट डे च्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे भाजपतर्फे आघाडी सरकार विरोधात एक आगळे-वेगळे हटके आंदोलन करण्यात आले. 

भारतीय जनता पक्षाकडून चॉकलेट डे निमित्ताने आघाडी सरकार विरोधात उपरोधिक आंदोलन करण्यात आले. यामध्ये सरकारने जनतेला आश्वासनरुपी दिलेल्या चॉकलेट ची आठवण आंदोलनमधून करून देण्यात आली.

कर्जमाफी, वीजबिल माफ, चुकीची आणेवारी इत्यादी विषयांना घेऊन भारतीय जनता पार्टी शेगावच्या वतीने  शिवाजी महाराज चौकात चॉकलेट डे च्या निमित्ताने सरकारने हि जनतेला चॉकलेट दिले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. नागरिकांना चॉकलेट वाटून सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यक्रते उपस्थित होते.

राणेंमध्ये उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत नाही
 
सिंधुदुर्ग : ''नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आज तरी राहीलेली नाही. त्यांनी कितीही गिफ्ट देऊ केली तरी शिवसेनेला त्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मनाचा मोठेपणा किती आहे तो दाखवून दिला. तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली तरी तुमच्या मेडीकल काॅलेजचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केला., दुसऱ्या कोणी केला नाही. त्यामुळे नितेश राणेंकडून गिफ्ट स्विकारण्याची वेळ शिवसेनेवर आज तरी आलेली नाही. माञ नितेश राणे यांच्यावर ती वेळ लवकरच येणार आहे,'' असा हल्लाबोल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. 

''वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही. शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नेय, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय'' असे काल नितेश राणे म्हणाले होते. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख