शिवसेनेचे वस्त्रहरण करणार..शेलारांचा निर्धार..

गामपंचायत, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रणनिती ठरविण्यात येत आहे.
as6.png
as6.png

मुंबई : ''शिवसेनेचा गड असलेला कोकणावर भाजपचे विशेष लक्ष आहे. कोकणातील जनतेचा कैाल भाजपच्या दिशेनं आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेचे वस्त्रहरण करणार,'' असा विश्वास भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

आशिष शेलार म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकार सध्या पैशाचा खेळ करण्याचा प्रयत्न करीत आहे. गामपंचायत, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रणनिती ठरविण्यात येत आहे.'' 

शिवसेनेने गुजराती मतदारांना भुरळ पाडण्यासाठी घेतलेल्या संमेलनाला सामान्य अन्यभाषक मुंबईकरही भुलणार नाहीत. उलट जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काल शिवसेनेवर केली आहे. 

भाजपचा गुजराती मतदार आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी शिवसेना लवकरच गुजराती संमेलन भरविणार आहे. त्यासाठी `जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा` अशी घोषणा शिवसेनेतर्फे दिली जाणार आहे. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, शिवसेनेच्या भ्रष्टाचारामुळे अशा संमेलनांचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. 

ते म्हणाले, अजान स्पर्धा भरवणाऱ्या शिवसेनेने आता गुजराती मतदारांना भुरळ पाडण्यासाठी संमेलन घ्यायचे ठरवले आहे. मात्र त्याला गुजराती मतदारच काय पण अन्यभाषक सर्वसामान्य मुंबईकर मतदारही भुलणार नाही. कारण शिवसेनेने फक्त मतांसाठी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने मुंबईकराचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे भले, जिलबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, अशा घोषणा शिवसेनेने दिल्या तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट, जिलबी अनेक फाफडा अन जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका आता गुजराती मतदारांनी घेतल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

नुकतेच वडाळा विभाग शिवसेनेने उर्दूतून काढलेल्या कॅलेंडरमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा न करता जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला होता. त्यामुळे भातखळकर यांनी शिवसेनेचा उल्लेख जनाब सेना असा केला आहे.  

किंबहुना यावेळी सर्वसामान्य मुंबईकरांनीदेखील हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेने आता मतदारांना भुलवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे येत्या महापालिका निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com