पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न..प्रेमवीर पोलिस निलंबित.. - Police attempt suicide at Dighi police station Police Suspended | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न..प्रेमवीर पोलिस निलंबित..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

फौजदार महिलेशी  दीड वर्षापासून त्याचे  प्रेमसबंध होते.

पिंपरी : एका पोलिसाने पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलिस ठाण्यात ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून दारुच्या नशेत या पोलिसाने हा प्रताप केला. त्याबद्दल त्याच्यावर दुहेरी कारवाई झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गु्न्हा नोंदविल्यानंतर त्याला सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

अनिल संपत निरवणे असे या पोलिसाचे नाव आहे. तो दिघी पोलिस ठाण्यात काम करीत होता. फौजदार महिलेशी (पीएसआय) दीड वर्षापासून त्याचे  प्रेमसबंध होते.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच या दोघांत वाद झाला. त्यात त्याने आपल्या प्रेयसीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.स्वतःच्या जीवाचेही काही बरेवाईट करू असे सांगितले. त्यानंतर तो पोलिस ठाण्याच्या एकमजली इमारतीच्या गच्चीवर गेला.तेथून त्याने खाली उडी मारली. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता, असे दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले.

त्याच्या कंबरेला दुखापत झाली असून जीवाला धोका नसल्याची माहिती त्यांनी दिली. आत्महत्येचा प्रयत्न करण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्याच्याविरद्ध घटना घडल्यानंतर १८ दिवसांनी परवा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच निरवणेला निलंबित करण्यात आले आहे. 

हेही वाचा:अर्णव गोस्वामींच्या फोटोला मारले जोडे...
 पिंपरी : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे  रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी यांच्या प्रतिमेला पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसने जोडे मारून त्यांचा काल धिक्कार केला. केंद्रातील भाजप सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला. शहरातील मुख्य डॉ. बाबासाहेब आंबे़डकर चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अर्णव गोस्वामी मुर्दाबाद, भाजपा का दलाल मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख