शरद पवार बोलतोय, असा फोन केला अन् पोलिसांच्या तावडीत अडकले

दिवसभरामध्ये अशा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
 Shadar Pawar .jpg
Shadar Pawar .jpg

मुंबई : बदलीसाठी मंत्रालयात राष्ट्रावादी काँग्रेससचे अध्यक्ष शरद (Shadar Pawar) पवारांचा आवाज काढून फोन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवार यांचा आवाज काढून एकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह (Ashish Kumar Singh) यांना फोन केला. त्याविरोधात मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. (Police arrested three persons for calling in the name of Shadar Pawar) 

दरम्यान, पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन 'जमीन व्यवहाराबाबत प्रकरण मिटवा,' असा फोन आल्याने खडबळ उडाली आहे. या प्रकरणी चाकण येथील उद्योजक प्रताप खांडेभराड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या बाबात पोलिसांनी माहिती दिली की, व्याजाने दिलेले पैसे उकळण्यासाठी पवारांचा आवाज काढून दम दिला. 

मुद्दलपोटी जमिन लिहुन घेतली असताना व्याजाच्या वसुलीसाठी दगादा लावला होता. आरोपीने वेबसाईटचा वापर करुन साथीदाराच्या मदतीने फोन लावला केला. धिरज पठारे नामक व्यक्ती व त्याच्या साथीदाराविरुद्ध चाकण पोलिसांनी कलम ३८७, ५०४, ५०६, ५०७, ३४ सह आयटी अँक्ट ६६सी ६६ डि नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे आवाज काढून आरोपीने अनेकांना फसवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने चाकण पोलिस गांभीर्याने तपास करत आहेत. 

मुंबई येथील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानातून बोलत असल्याचे आपोपीने सांगितले होते. दिवसभरामध्ये अशा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खुद्द शरद पवार यांचा आवाज काढून फोन केल्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com