"मी त्याची गर्लफ्रेंड नाही".. तो 'राज' म्हणून भेटला होता..'मिस्ट्री गर्ल'चा नवीन खुलासा..  - pnb scam mehul choksi abduction drama barbara jarabica disclose many points | Politics Marathi News - Sarkarnama

"मी त्याची गर्लफ्रेंड नाही".. तो 'राज' म्हणून भेटला होता..'मिस्ट्री गर्ल'चा नवीन खुलासा.. 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

मेहुल चोकसी अपहरण प्रकरण खोटे असल्याचेही तिने सांगितले.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी, हिऱ्यांच्या व्यापारी मेहुल चोकसी प्रत्यार्पण प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही चर्चा काही दिवसापासून रंगली आहे. यात बारबरा जबरिका हि त्यांची गर्ल फ्रेंड असल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते. आता बारबरा जबरिका हीने त्यांच्या नातेसंबधाबाबत स्वतः खुलासा केला आहे. एनआयए या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.  pnb scam mehul choksi abduction drama barbara jarabica disclose many points

"मी अनेक वेळा याबाबत स्पष्ट सांगितले आहे की मी त्याची गर्लफ्रेंड नाही. आमची भेट झाली तेव्हा त्याने मला त्याचे नाव 'राज' असल्याचे सांगितले होते.  माझ्या जवळ स्वतःचा उद्योग - व्यवसाय आहे. मला त्याच्या पैशांची, मदतीची, हॅाटेल बुकिंग, दागिन्यांची गरज नाही," असे बारबरा हीने स्पष्ट केले आहे. मेहुल चोकसी अपहरण प्रकरण खोटे असल्याचेही तिने सांगितले. त्याने मला हिऱ्याचे दागिने दिले होते. ते बनावट होते, असेही तिने सांगितले.

"मेहुल चोकसीच्या गैरव्यवहाराची मला माहिती नाही, मला भारतातील भष्ट्राचारी लोकांबाबतही माहिती नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांतून मला ही माहिती मिळाली. त्याने मला क्युबा येथे भेटणार असल्याचे सांगितले होते. त्याचा क्युबा येथे जाण्याचा बेत होता. त्यांना डोमिनिका येथ जायचे नव्हते.  एटिंगुआ येथील नागरिकांनाही मेहुल चोकसीच्या पार्श्वभूमीबाबत माहित नाही," असे बारबरा हिने एनआयएला सांगितले.  

काही दिवसापूर्वी मेहुल चोकसीची पत्नी प्रीति चोकसीने सांगितले की, मेहुलच्या जिवाला धोका आहे. प्रीतिने डोमिनिकाच्या सुमद्रकिनाऱ्यावर मेहुलसोबत दिलेल्या त्याच्या कथित गर्लफ्रेंडसंदर्भातही महत्वाचा खुलासा केला होता. मेहुलला अटक करण्यात आली त्या दिवशी काय घडलं यासंदर्भातही प्रीतिने सविस्तरपणे भाष्य केलंय.   प्रीतिला मुलाखतीदरम्यान मेहुल यांच्यासोबत नाव जोडलं जाणाऱ्या मुलीसंदर्भात म्हणजेच बारबरा जबरिकासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना, “मला माहितीय की मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ती अँटिग्वा आली होती. तेथील बेटांवरील आमच्या दुसऱ्या घरीही ती येऊन गेली होती. तेथील स्वयंपाक्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती,” असं प्रीतिने सांगितलं. 

मेहुल चोकसी यांचे प्रत्यार्पण लांबणीवर पडले आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी डोमिनिका येथे गेलेले सीबीआयचे पथक परत आले आहे. प्रत्यार्पणाच्या सुनावणी आधी चोकसीवर असलेल्या दोन आरोपावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यार्पणावर डोमिनिका न्यायालयात सुनावणी होणार आहे. मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. तो भारतात आल्यावर अनेक महत्वाच्या बाबी उजेडात येणार आहे. चोकसीला परत आणण्यासाठी बॉम्बार्डियर ग्लोबल जेट 5000 हे विशेष विमान गेलं होतं. त्याचं एका तासाचे भाडे ९ लाख रुपये आहे. एँटिगुआ जाण्याचा खर्च सुमारे १.३५ ते १.४३ कोटी रुपये आहे. अन्य खर्च धरुन सुमारे ३ कोटी रुपये या पाच- सहा दिवसात खर्च झाले असावेत.  
Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख