राजीव गांधींचे पत्र अन् उपजिल्हाधिकारी माझ्या घरी आले...

पंतप्रधान कार्यालयातून शहानिशा करणारे पत्रदेखील आले.
3Sarkarnama_20Banner_20_2849_29_0.jpg
3Sarkarnama_20Banner_20_2849_29_0.jpg

पुणे :  "सामान्य कार्यकर्त्यांच्या पत्रांचीही राजीव गांधी Rajiv Gandhi दखल घेत. १९८६मध्ये त्यांनी राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर, केंदूर पाबळला ते आले होते. त्यांच्या दौऱयानंतर साधारणतः महिन्यानंतर त्या गावात गेलो. तेथील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या लोकांशी बोलल्यावर त्यांना मिळणाऱ्या रोजगारात विसंगती आढळली. माझ्या लेटरपॅडवर पत्र लिहून पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी उपजिल्हाधिकारी माझ्या घरी आले, तसेच पंतप्रधान कार्यालयातून शहानिशा करणारे पत्रदेखील आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्या भेटायला या, असे सांगितले," अशी आठवण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितले.PM Rajiv Gandhi death anniversary

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. २१मे) तिसावी पुण्यतिथी. यानिमित्ताने बालगुडे बोलत होत. सामान्य कार्यकर्त्यावरील नेत्याचा विश्वास, त्याच्या तक्रारीची तड लावण्याची त्यांची वृत्ती तसेच त्याला बळ देण्याचे त्यांचे धोरण दिसून येते, असे बालगुडे म्हणाले.  

राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही स्वर्गीय राजीवजींच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय स्वर्गीय राजीवजींना Rajiv Gandhiआहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. 
  
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करताना  अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे. 

आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित रहावी, सर्वधर्मसमभाव कायम रहावा, यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. राजीवजींचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे  आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com