शुभेंद्रु अधिकारी यांना मोदींचे निमंत्रण..ममता बॅनर्जी भडकल्या..बैठकीस अनुपस्थित राहणार.. - pm modi to visit affected areas of bengal odisha will also meet mamta banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

शुभेंद्रु अधिकारी यांना मोदींचे निमंत्रण..ममता बॅनर्जी भडकल्या..बैठकीस अनुपस्थित राहणार..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 मे 2021

शुभेंद्रु यांना निमंत्रित करण्यात आल्याने ममता दीदींनी संताप व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : यास वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या दैाऱ्यावर आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला भाजपचे नेते शुभेंद्रु अधिकारी यांना मोदींनी निमंत्रित केल्याने मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या आहेत. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितलं.  बैठकीला शुभेंद्रु यांना निमंत्रित करण्यात आल्याने ममता दीदींनी संताप व्यक्त केला आहे. pm modi to visit affected areas of bengal odisha will also meet mamta banerjee

बंगाल आणि ओडिशाच्या दैाऱ्यावर नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक याच्यासोबत आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीला राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर ते बंगालमध्ये आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी या नुकसानीचा अहवाल मोदींकडे सुपूर्त करणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ममतादीदी आणि मोदी यांची भेट होत आहे. राज्यपाल जगदीप धनखड हे मोदींच्या स्वागतासाठी कलाईकुंडा विमानतळावर पोहचले आहेत. 

हेही वाचा : मायावतींबाबत आक्षेपार्ह विधान..'राधे' मधील कलाकार अडचणीत..  

मुंबई : 'बजरंगी भाईजान' सलमान खान यांच्या 'राधे' चित्रपटात खलनायकांची भूमिका करणारा रणदीप हुड्डा त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत सापडला आहे. बहुजन समाज पक्षाच्या  सर्वेसर्वा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबत रणदीप हुड्डा यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर  #arrestRandeepHooda ट्रेंड सुरु आहे.  

रणदीप हुड्डा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डाने मायावती यांच्याबाबत अश्लील विनोद सांगितला आहे. यात त्याने मायावती यांची थट्टा केली आहे.  रणदीप हुड्डा हा आक्षेपार्ह शब्द वापरुन मायावती यांची थट्टा करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रणदीप हुड्डा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत.
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख