कोरोना लसीबाबत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचेच 'वेट अॅन्ड वॉच'  

पुण्यात ८०० पैकी ४३८ जणांना ही लस देण्यात आली.
corona vaccine.jpg
corona vaccine.jpg

पिंपरी: चक्कर येण्यासारखे किरकोळ अपवाद वगळता कोरोना लसीकरणाची सुरवात उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये व्यवस्थित झाली. फक्त ती दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याबाबत तूर्त वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतल्याने पहिल्या दिवशी लक्ष्य गाठण्यात अपयश आले. शहरात ५७ टक्के लसीकरण झाले. २४ जणांनी लस टोचून घेण्यास चक्क नकार दिला. दरम्यान, कोविन अॅपव्दारेच ही लस देण्याचे केंद्राने आता ठरवल्याने त्याच्या तयारीसाठी या मोहिमेला आज व उद्या ब्रेक देण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये २९८, पुण्यात ३३०,तर उर्वरित पुणे जिल्ह्यात ५२२ अशा एकूण ११५० जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ती प्रत्येकी आठशे, तर उर्वरित जिल्ह्यात ती दीड हजार जणांना पहिल्या दिवशी दिली जाणार होती. मात्र, जिल्ह्यात ३१०० पैकी १८०२ जणांना ती देण्यात यश आले.लसीकरणासाठी आलेल्यांपैकी ७१ जणांनी ती घेण्यास नकार दिला. तर नऊजण हे अल्पवयीन आढळल्याने त्यांना ती दिली गेली नाही. त्यातील आठ पिंपरी-चिंचवडमधील आहेत. याचाच अर्थ हे नऊ अल्पवयीन हे वैद्यकीय कर्मचारी आहेत, हे विशेष. अल्पवयीनांच्या जोडीने गरोदर महिला व इतर आजार असलेल्या व लस घेण्यास आलेल्या जिल्ह्यातील ७७ जणांनाही ती टोचण्यात आली नाही. त्यातील २२ जण हे उद्योगनगरीतील आहेत.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्यात ती वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत दिली जात आहे. काल पुण्यापेक्षा (५५)पिंपरी-चिंचवडमध्ये दोन टक्के जास्त (५७) लसीकरण झाले. तर, लस नाकारण्यात, मात्र पुणे हे उद्योगनगरीच नव्हे, तर जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागापेक्षाही आघाडीवर राहिले. ही दोन्ही शहरे वगळता पुणे जिल्ह्याने ६१ टक्के लसीकरण करीत पुणे जिल्ह्याने शिक्षणनगरी आणि उद्योगनगरीवर आघाडी घेतली. दुसरीकडे या दोन्ही शिक्षित शहरांच्या तुलनेत कमी शिक्षित असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बाकीच्या ग्रामीण भागात लस नाकारण्याची संख्या लसीकरण दुप्पट असूनही अवघी १५ निघाली. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये २४ आणि पुण्यात ३२ जणांनी ती घेण्यास नकार दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये ८०० पैकी ४५६, तर पुण्यात ८०० पैकी ४३८ जणांना ही लस देण्यात आली. 

उर्वरित पुणे जिल्ह्यात १५०० पैकी ९०८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती टोचण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये  प्रत्येकी आठ, तर जिल्ह्यात यासाठी १५ केंद्रे सुरु करण्यात आलेली आहेत. राज्यातील २८५ केंद्रावर पहिल्या दिवशी १८,३३८ जणांनी ही लस दिली गेली. ही टक्केवारी ६४ टक्के असून ती पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यापेक्षाही अधिक आहे. सिंबायोसिस मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलने मात्र आपला शंभरजणांचा कोटा पूर्ण करीत शंभर टक्के लसीकरण केले. पुणे ग्रामीणमधील केंद्राचे हे यश पिंपरी-चिंचवड व पुण्यातील एकाही केंद्राला साध्य करता आले नाही.सर्वात कमी लसीकरण कान्हेफाटा,ता.मावळ (३३) आणि कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे (३४) येथे झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com