संभाव्य तिस-या  लाटेचा धोका टाळण्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र्य रुग्णालय - Pimpri Chinchwad hospital for children to avoid the risk of third Corona wave | Politics Marathi News - Sarkarnama

संभाव्य तिस-या  लाटेचा धोका टाळण्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र्य रुग्णालय

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 मे 2021

मुलांकरिता खास स्वतंत्र रुग्णालय  तयार करण्याचे आदेश पिंपरीच्या महापौर माई ढोरे यांनी  प्रशासनाला दिले.

पिंपरी : कोरोनाच्या तिस-या संभाव्य लाटेचा लहान मुलांना असणारा धोका टाळण्यासाठी मुलांकरिता खास स्वतंत्र रुग्णालय  hospital for children तयार करण्याचे आदेश पिंपरीच्या महापौर माई ढोरे Mai Dhore यांनी शुक्रवारी (ता. ७) प्रशासनाला दिले. (Mayor ordered to get ready for third wave of covid)

शहरवासीयांच्या जीविताचा विचार करुन १५ लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस स्वखर्चाने खरेदी करण्याची पालिकेची तयारी आहे. त्यासाठी सरकारची त्वरीत परवानगी देण्याची मागणीही ढोरेंनी केली. महापौर दालनात आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही  मागणी केली. उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अड. नितीन लांडगे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार कामठे सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे आदी यावेळी उपस्थित होते. 

शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सध्या सुरू आहे. तथापि लसीच्या अपु-या पुरवठ्यामुळे लसीकरणाची संख्या कमी आहे. त्यामुळे लस उत्पादक कंपनीकडून सदर लस थेट खरेदीचा विषय नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूरही करण्यात आला आहे.

हेही वाचा : लसीकरणासाठी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी  दिले २५ लाख रूपये..
पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीच्या खरेदीसाठी पिंपरीचे राष्ट्रवादीचे ncp आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपये काल (ता.७)  दिले. ही लस आपल्या मतदारसंघातील नागरिकांना द्यावी, याकरीता त्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख Rajesh Deshmukhयांना पत्र दिले. लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते शहरातील पहिलेच आमदार आहेत. मार्च महिन्यात बनसोडेंनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी सव्वा कोट रुपये आपल्या आमदार निधीतून दिले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या सिटीस्कँन चाचण्या आता मोफत होणार आहेत. त्यांना आतापर्यंत बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क त्यासाठी मोजावे लागत होते. याव्दारे HRCT SCORE किती आहे, हे कळते. त्यानुसार पुढील उपचारांची दिशा डॉक्टरांकडून ठरवली जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख