दादा-भाऊ समेटावर शिक्कामोर्तब...राष्ट्रवादी, शिवसेनेची निराशा - pcmc standing committee meeting was ogganized smoothly | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

दादा-भाऊ समेटावर शिक्कामोर्तब...राष्ट्रवादी, शिवसेनेची निराशा

उत्तम कुटे
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

शहराचे कारभारी महेशदादा लांडगे आणि लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

पिंपरी : गेल्या दोन बैठकांसारखा कालच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत राडा झाला नाही. त्यामुळे शहराच्या दोन कारभारी भाजप आमदारांत काल मुंबईत झालेल्या समेटावर जणू काही शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, या बैठकीत पुन्हा राडा होईल, या भीतीने विरोधी पक्ष राष्ट्रवादी शिवसेनेचे समितीतील चार सदस्य हे हेल्मेट घालून आजच्या बैठकीला आले होते. मात्र, त्यांची निराशा झाली. कारण त्यांना अपेक्षित राडा झालाच नाही. सभेचे कामकाज व्यवस्थितपणे सुरु झाले. त्यामुळे त्यांना हेल्मेट काढावे लागले.

पदाधिकारी नियुक्त्यांतून महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे आमदार व शहराचे कारभारी महेशदादा लांडगे आणि लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यातून स्थायीच्या गेल्या दोन बैठकांत भाऊ समर्थक सदस्यांनी मोठा राडा केला होता.

दादा, भाऊंतील या वैराचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची भीती असल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल  दादा, भाऊंत मुंबईत समेट घडवून आणला होता. त्याला काल दुजोरा मिळाला. परिणामी तीन तहकूबसह आजची अशा चार बैठकांचे कामकाज सुरळीतपणे पार पडले. १७९ कोटी २४ लाख रुपयांचे विषय मंजूर झाले.

पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि भाजपचे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यातील का रे दुरावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे मुंबईत संपुष्टात आला. त्याला महेशदादांच्या गोटातून दुजोरा देण्यात आला. भाऊ ज्येष्ठ असल्याने दादांनी मन मोठे करीत थोडी पडती बाजू घेतल्याने हा समेट झाल्याचे समजते. पण, तो झाल्याला खरा दुजोरा काल दुपारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीतून मिळणार होता. भाऊंच्या समर्थक सदस्यांच्या राड्याशिवाय ही बैठक पार पडली, तरच खऱ्या अर्थाने भाऊ, दादांच्या पाठिराख्यांतही ही दिलजमाई झाल्याचे स्पष्ट होणार होते. ही बैठक व्यवस्थित पार पडल्याने विरोधकांचा भ्रमनिरास झाला. 

२०१७ ला प्रथमच पालिकेत सत्ता आल्यानंतर दादा व भाऊ गटात पदाधिकारी नियुक्त्यांवरून शीतयुद्ध सुरु झाले. नंतर त्याला मोठे गंभीर वळण मिळाले. दरम्यान, एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना कट्टर विरोधक होऊन राज्यात तो सत्तेत आल्याने हा दुरावा आणखी वाढला. कारण, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भाऊंचा कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या कामाला स्थायीतील दादा समर्थकांनी पाठिंबा दिल्याने हा वाद राडा होण्यापर्यंत गेल्या दोन बैठकांत पोचला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख