पूरग्रस्तांना विम्याची पन्नास टक्के रक्कम त्वरित द्या ; राष्ट्रवादीचे अर्थमंत्र्यांना पत्र

खासदार, सुनील तटकरे,सुप्रिया सुळे यांनी निर्मला सितारामन यांची भेट घेतली.
Sarkarnama Banner - 2021-08-03T145224.511.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-03T145224.511.jpg

रायगड : रायगड Raigad आणि रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे महाड, पोलादपूर, खेड, चिपळूणमध्ये अनोनात नुकसान झाले. नागरिकांसह व्यापारी वर्गाचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे MP Sunil Tatkare यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन Nirmala Sitharamanयाची खासदार सुप्रिया सुळे याच्या सोबत भेट घेतली. इन्शुरन्स कंपन्यांनी नुकसान झालेल्या व्यापारी याना विनाविलंब त्वरित 50 टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी त्यांनी खासदार तटकरे यांनी केली आहे. याबाबतचे  निवेदन खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले आहे. 

कोरोनात जन्मलेला 'मसीहा' सोनू सूद पूरपरिस्थितीत गायब ; ठाकरेंचा सवाल
ता. 22 जुलै रोजी आलेल्या पुराने रायगडमधील महाड, पोलादपूर आणि रत्नागिरीमधील खेड, चिपळूण शहरात पूरस्थिती निर्माण झाली. पुरात नागरिकांच्या घरात तर दुकानदाराच्या दुकानात पाणी घुसले. त्यामुळे घरातील आणि दुकानातील सामानाचे अतोनात नुकसान झाले. व्यापारी तसेच नागरिकांनी विविध कंपन्यांचे इन्शुरन्स काढले आहेत. मात्र अशा पूरपरिस्थिती इन्शुरन्स कंपन्या ह्या ग्राहकांना जाचक अटीच्या फेऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्वरित पैसे देण्यास अडचण निर्माण करीत आहेत. त्यामुळे ग्राहक हा हवालदिल झाला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगड आणि रत्नगिरी येथील दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. 

मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो!
सुनील तटकरे यांनी व्यापाऱ्याच्या इन्शुरन्स कंपन्यांच्या अडचणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घालून 2005 प्रमाणे विमा कंपन्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी केली. याबाबत शरद पवार यांनीही सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन याची खासदार सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे याच्या सोबत भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पूरपरिस्थिती आणि व्यापारी याच्या विमा कंपनी बाबत असलेक्या अडचणीबाबत माहिती दिली. व्यापाऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून विमा कंपन्यांनी कोणत्याही जाचक अटी न लावता त्वरित 50 टक्के रक्कम अदा करावी अशी मागणी निवेदन द्वारे खासदार सुनील तटकरे यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com