चंद्रकांतदादा खडसेंना उद्देशून म्हणाले, 'पक्षाने खूप दिलं आणि ३०-३५ वर्षे तुमचंच ऐकलं!'

एकनाथ खडसे यांनी आता शांत राहावे, असा सल्ला चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अप्रत्यक्षरित्या दिला.
khadase and chandrakantdada
khadase and chandrakantdada

पुणे : एकनाथ खडसे यांना पक्षाने खूप दिले आहे. शिवाय पक्षाने ३०-३५ वर्षे त्यांचेच ऐकले आहे. दहापैकी नऊ गोष्टी मिळाल्या की पक्ष चांगला आणि एखादी नाही मिळाली की पक्षावर नाराज व्हायची गरज नाही आणि नाराजी असूही नये, असे स्पष्ट करतानाच 'एखाद्याला रागवताना, शिव्या घालताना उद्या त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवावे लागणार नाही ना? याचा विचार करा' असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे.

पाटील यांनी 'साम टीव्ही'ला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. 'साम'चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपने खडसे यांना खूप दिल्याचे सांगत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले 'केंद्रीय पातळीवर एकनाथ खडसे यांच्याबाबत काय विचार केला गेला याची मला माहिती नाही. पण केंद्रीय पातळीवर असा विचार झाला असेल, की आजवर पक्षाने खडसेंना पक्षाने खूप दिले. आता त्यांनी पालक, वरिष्ठ आणि मार्गदर्शक म्हणून काम करावे.

'खडसेंना आजवर ७ वेळा विधानसभा, युतीत मंत्रीपद, गेल्यावेळीही मंत्रीपद, जावळे यांचे नाव संसदीय बोर्डाने जाहीर करुनही सून रक्षा खडसे यांना उमेदवारी, मुलीला विधानसभा उमेदवारी, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, महानंदचे अध्यक्षपद असे खूप काही दिले असा विचार केंद्रीय पातळीवर केला असेल. नाथाभाऊंसारखे सिनियरसोबत हवेत असा आमचा आग्रह होता. मात्र केंद्राने विचार केला असेल आता मार्गदर्शक म्हणून काम करावे', असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com