पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर बसण्याचा याने घेतला आनंद ! - "Parrot" sits on the shoulders of Prime Minister Narendra Modi ...! | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर बसण्याचा याने घेतला आनंद !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

येथे तीस प्रकारचे गवतही लवण्यात आले होते

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षीप्रेमी आहेत असे दिसून येते. काही दिवसापूर्वी त्यांनी पंतप्रधान निवासात मोरांना चारा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

या व्हिडिओवर कॉंग्रेससह विरोधकांनी जोरदार टीका केली होती. देशाच्या राजकारणात मोदी आणि मोर हा विषय चांगलाच गाजला होता. 

त्या मोरानंतर आता मोदींनी दोन पोपट आपल्या हातावर घेतले. त्यापैकी एक पोपट चक्क त्यांच्या खांद्यावर जावून बसला होता असा एक व्हिडिओ "एएनआय'ने प्रसिद्ध केला आहे. मोरानंतर आता मोदी आणि पोपटाची चर्चा देशभर होणार नाही तर काय होईल ? 

निमित्त होते भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडी येथील जंगल सफारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरदार पटेल प्राणिसंग्रहालयात आज मोदी उपस्थित होते.

चक्क देशाचे पंतप्रधान येणार म्हटल्यानंतर माणसांबरोबरच पक्षांनाही अर्थात मोदींचे आकर्षण हे असणारच. मोदी हे पक्षांसोबत रमतात हे मोरांवरून दिसून आलेच आहे. 

पंतप्रधान मोदी हे या प्राणिसंग्रहालयात पोचल्यानंतर येथील एका महिलेने त्यांचे स्वागत करताना प्रारंभी एक पोपट त्यांच्या उजव्या हातावर ठेवला. तो पोपट हातावरच खेळत राहिला आणि काही क्षणानंतर दुसरा पोपट त्यांच्या डाव्या हातावर ठेवला. हा पोपट मनगटावर थांबला नाही.

तो हळूहळू चालत मोदींच्या कोपरापासून पुढे वर चढत गेला आणि चक्क त्यांच्या खांद्यावर जावून बसला. तो काहीवेळ तसाच खांद्यावर होता. कदाचित पंतप्रधानांच्या खांद्यावर बसल्याचा आनंद त्याला मिळाला असावा. 

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पशुपक्षांवर मनापासून प्रेम करतात. त्यांना पक्षाबरोबर राहण्याचा आनंद मिळतो. हे माहित असल्याने मोदी येणार म्हटल्यावर सर्व तयारी या प्राणिसंग्रहालयात करण्यात आली होती. येथे तीस प्रकारचे गवतही लवण्यात आले होते.

बघा, आपण कोणत्याही पक्षाप्राण्यावर प्रेम करा ते कोणालाही त्रास देणार नाहीत. मोदी यांनी या प्राणिसंग्रहालयात पोपटांबरोबर काही क्षण घालवून आनंद मनमुराद आनंद लुटला. मोर असो की पोपट मोदी पक्षांविषयी खूप प्रेम आहे हे दिसून येते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डाव्या हातावरील पोपटालाही चक्क पंतप्रधानाच्या खांद्यावर बसण्याची आजसंधी मिळाली. किती नशीबवान तो पोपट. देशभरातील कोट्यवधी लोकांना असे वाटते, की मोदींनी एक क्षण जरी आपल्याशी बोलावे म्हणून. पण, तशी संधी प्रत्येकाला मिळतेच असे नाही. माणसापेक्षा आज एका पोपटाला पंतप्रधानांच्या खांद्यावर बसण्याचे भाग्य लागले. काय नशीब त्या पोपटाचे. 

दोन पोपट मोदींच्या दोन हातावर होते परंतु, डाव्या हातावरील पोपटांने त्यांच्या मनगटावर न थांबता चक्क खांदा गाठला. मोदी यांच्या सारखा नेता प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्यांच्यावर देशातील जनता जे प्रेम करते. ते प्रेम आज तरी इतर कुठल्याही नेत्याला मिळत नाही हे ही पूर्ण सत्य आहे. काही असो मोरापेक्षा पोपट भारी निघाला.

मोराला मोदींनी दाणे चारले होते. आजच्या पोपटाला त्याचा आवहता पेरू वैगेरे मिळाला नाही. मात्र त्या पोपटाचे भाग्य आज उजळून निघाले. नाही तरी पोपट आणि राजकारण यांचा नजिकचा संबंध आहे. सर्व पक्षांमध्ये पोपट बोलतो असे मानले जाते. आज तो पोपट काही बोलला नाही. त्यांनेही शांतपणे पंतप्रधानांचा खांदा गाठला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख