परमबीरसिंगांच्या अडचणी वाढणार; 'त्या' तीन प्रकरणांमध्ये एसीबी करतेय गोपनीय चौकशी

पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीरसिंग यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता.
 Parambir Singh .jpg
Parambir Singh .jpg

मुंबई :  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या तीन तक्रारींप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी (डिसक्रीट इन्कायरी) करण्यात सुरवात केली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे, अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारींमध्ये परमबीरसिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. (Parambir Singh difficulties will increase; ACB is investigating in three cases)

ही चौकशी तीन महिन्यात पूर्ण केली जाते. ही एक प्रकारची प्राथमिक चौकशी असते. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारावर खुली चौकशी सुरू करण्यात येते, अथवा गुन्हा दाखल करण्यात येतो किंवा चौकशी बंद करण्यात येते. ज्या व्यक्तींनी या तक्रारी केल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्यात येणार आहे.

पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीरसिंग यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. 14 पानी या पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आले होते. पत्रात घाडगे यांनी परमबीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशिरित्या आदेश दिल्याचा आरोप केला होता. 

तसेच डांगेच्या तक्रारीतही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्याशिवाय व्यावसायिक सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्याचे आरोप केले होते. त्याप्रकरणी आता एसीबी अधिक चौकशी करत आहे.  

काय आहेत घाडगे यांचे आरोप?

परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त,ठाणे शहर व अन्य कोणत्याही ठिकाणी नेमणुकीस असतांना त्याचे सोबत पोलिस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा मो.नं.९८६७०५९२९२ आणि पो.ना.प्रशांत पाटील मो.नं.९८२१८६९६२५ असे दोघजण हे गेले २० वर्षांपासुन सोबत होते. त्यांच्यासोबत दिवसरात्र खाजगी व्यवहारासाठी व बदल्यांमधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. त्या दोघांनाही परमबीरसिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे, याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीरसिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दुसऱ्याचे नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.(Parambir Singh difficulties will increase; ACB is investigating in three cases)

परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे येथे नेमणूक होण्यापुर्वी ते पोलीस आयुक्त,परिमंडळ-३,कल्याण येथे नेमणुकीस असल्यापासुन ते प्रकाश मुथा (रा. कल्याण) यांना चांगल्या प्रकारे ओळखत असुन ते त्याचे मित्र आहेत. त्यांच्यामार्फत रिव्हाॅल्वर  लायसन्सचे कामाचे १० ते १५ लाख रूपये घेवून लायसन्स दिले जात होते. तसेच बिल्डरांची कामे त्यांच्यामार्फत होऊन त्यामध्ये करोडो रूपयांची देवाणघेवाण वा सेटलमेंट करून केली जात होती. जो पोलीस अधिकारी त्यांचे बेकायदेशीर ऐकत नसे त्याच्याविरूद्ध खोटे गुन्हे दाखल केले जायचे किंवा त्यांची बदली हे नियत्रंण कक्ष येथे केली जात होती. (उदा.पो.नि. कदम याची बदली मानपाडा पो.स्टे ते ठाणे नियत्रंण कक्ष अशी करण्यात आली होती. तसेच माझ्याविरूध्द पाच खोटे गुन्हे नोंदविले होते.)

परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. त्यांच्याकडे बदल्यांतील भष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे देखील काम करत होते. परमबीरसिंग यांची करोडो रुपयांची संपत्ती जमविल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. सिंगापूरला दोन हजार कोटी तर इंडियाबुल्स मध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे.

परमबीरसिंग हे दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनचे डिसीपी कडुन प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहायक पोलिस आयुक्ताकडुन प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट घेत होते. परमबीर सिंग यांनी भष्टाचार करून मिळविलेले पैसे हे बिल्डर बोमन इराणी आणि रूरूतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण रेतीबंदर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हददीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपर वजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज करोडो रूपयाची उलाढाल होत होती. त्यामध्ये पराग मणेरे हे भागीदार होते. रेती माफिया शेगप करेल हा होता. अवैध रेती व्यावसायिकावर कायदेशीर कार्यवाही केल्यास त्या पोलिस अधिकाऱ्याविरूध्द खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकविले जात होते त्यामध्ये मलाही

खोटया गुन्हयात अडकाविले आहे.(सदर बाबत मी दि.१७ मार्च,२०१६ रोजी लेखी तकार दिलेली आहे.) असेही पत्रात म्हटले आहे. तसेच परमबीरसिंग यांनी त्याचा मुलगा रोहन यांचे नावाने सिंगापुर येथे व्यवसाय सुरू केला असुन त्यामध्ये सुमारे रू.२०००/- करोडची गुतवणंक केली असुन त्यामध्ये सुमारे रू.५००/- करोडचे नुकसान या वर्षी झाल्याचे गोपनीयरित्या समजले आहे.(Parambir Singh difficulties will increase; ACB is investigating in three cases)

परमबीर सिंग यांनी अॅन्टालिया रोड, मुंबई येथे रूपये ६३ करोडचा बंगला वजा प्लॅट खेरदी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुलगा रोहन याच्या लग्नानिमित्त चंडिगड, बंगलोर येथे  करोडे रूपये खर्च केले आहेत. लग्नाचे रिसेप्शन मुंबई येथे करण्यात आले होते. परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे कार्यरत असतांना त्यांनी बिल्डर जग्गु खटवाणी कोपरी यांचेकडे सुमारे रू.१००/-करोडची गुंतवणूक केली आहे. तसेच बिल्डर जितु नवलाणी,मुंबई यांचेकडे सुमारे रू.१०००/-करोडची गुंतवणूक वेगवेगळया व्यवसायात केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com