पंकजा मुंडे यांना आनंदच झाला असेल.... : चंद्रकांतदादा असे का बोलले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साम टिव्हीला मुलाखत देताना विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीमागील विश्लेषण केले.
pankaja munde
pankaja munde

पुणे : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांची उमेदवारी नाकारून भाजपने गोपीचंद पडळकर, रमेश कराड, प्रवीण दटके आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली.  त्यावरून उठलेल्या वादळाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले  की माझा एक सहकारी मोठा होत असेल तर मला आनंद वाटला पाहिजे. रमेश कराड यांच्या उमेदवारीचा आनंद नक्कीच पंकजा मुंडे यांना झाला असेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही याचा आनंद असेल', असे सांगत 'माझे पंकजा यांच्याशी अजून बोलणे झालेले नाही', असे पाटील यांनी स्पष्ट केले. साम टीव्हीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी पाटील यांच्याशी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. रमेश कराड यांना उमेदवारी देण्यामागे काही जातीय गणिते नव्हती. मात्र आपल्या समाजातील व्यक्तीला संधी मिळाली की त्या समाजाला आनंद होतो, असे त्यांनी सांगितले. संघ किंवा भाजप कधीही जातीय अंगाने विचार करत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

'रमेश कराड हे एक पॉवरफुल नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत युतीमुळे ऐनवेळी त्यांचे लातूर ग्रामीण मतदारसंघातून तिकीट नाकारले गेले. ते निवडणुकीत नसल्याने तेथे ५० हजार मते ही 'नोटा'ला पडली. सहकारी मोठा होतो आहे, ही संस्कृती भाजपात रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पाटील यांनी या वेळी सांगितले

कराडे हे आधी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते राष्ट्रवादीत गेले आणि तेथून विधान परिषदेचे निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरला. त्यानंतर मात्र पंकजा यांनी वेगवान हालचाली करत त्यांना परत पक्षात आणले. कराड हे परत भाजपमध्ये आल्याने सुरेश धस यांचा विजय सोपा झाला होता. ते आतापर्यंत पंकजा यांचे समर्थक होते. मात्र भाजपच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरला. त्यांचा अर्ज भरताना पंकजा अऩुपस्थित होत्या.

बावनकुळे यांची उमेदवारी नाकारल्याबद्दल पाटील म्हणाले की नेत्यांची इच्छा ही आज्ञा आहे, हे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे काय झालंय, हे वरिष्ठांना विचारण्याची माझी पातळी नाही. मात्र आपला आपल्या नेतृत्वावर विश्वास हवा. काहीतरी घडलंय, त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा आणि आताही संधी मिळाली नाही. पण काळाच्या ओघात ते कळेलच. मात्र मी प्रदेशाध्यक्ष असूनही बावनकुळे यांच्या बाबतीत काय झालं? हे माहिती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बावनकुळे यांची संधी का हुकली? याचे विश्लेषण करताना चंद्रकांतदादांनी सूचक इशाराही बावनकुळे यांना दिला आहे.

चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, 'निवडणुकीत उमेदवारांच्या नावाची केंद्राकडून मान्यता घेताना दुसरी यादीही तयार ठेवावी लागते. ज्यावेळी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची यादी पाठवली त्यावेळी केंद्राकडून कठोरपणे पर्यायी नावे पाठवण्यास सांगण्यात आले.`` 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com