पंकजा मुंडे घड्याळ बांधणार की शिवबंधन...

पंकजा मुंडे यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांच्या विषयी ही भाष्य केले.
 Pankaja Munde .jpg
Pankaja Munde .jpg

बीड : गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जागविल्या. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणासह कोरोना संदर्भात त्यांनी भूमिका मांडली. (Pankaja Munde said on the talk of leaving the BJP)

गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना मुंडे म्हणाल्या, त्यांची आठवण माझ्या मनातुन जात नाही. नियमीत मला आठवण येते, पण आता त्यांची उणीव भासते. त्यांनी २६ मे २०१४ रोजी केंद्रीय ग्रामवीकास मंत्री पदाची शपथ घेतली होती. तो दिवस ते ३ जून पर्यंतचा हा काळ आमच्या परिवारासाठी सगळ्यात कठीण असतो. त्यांचा तो चेहरा मला नियमीत आठवतो, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसापूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की पंकजा मुंडे भाजप सोडणार यावर त्यांना पंकजा मुंडे घड्याळ बांधणार की शिवंबध?  असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले. त्या म्हणाल्या ही वर्षाभरापूर्वीची चर्चा होती, अश्या चर्चा होत असतात त्या माझ्यासाठी नवीन नाहीत, अशा चर्चांची मला सवय आहे, पण त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले.  

पंकजा मुंडे यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विषयी ही भाष्य केले. त्या म्हणाल्या लोकांना वाटते की पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष आहे. असे काही नाही, एकत्र काम करत असताना प्रत्येकाचे मत प्रवाह वेगळे असतात. आमच्यामध्ये चांगला संवाद आहे. ते मुख्यमंत्री असाताना मी त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. आमच्यामध्ये काही गोष्टीमध्ये मतभेद असतील पण मनभेद नाहीत. आमच्या पक्षाच्या अनेक बैठका होत असतात, त्यामध्ये आम्ही भेटत असतो.

राज्य पातळीवर काम करायला आवडेल की देश पातळीवर असे विचारण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या, आपली छत्री मोठी झाली पाहिजे, छत्रीमोठी तेव्हडी सावली मोठी होते. राज्य पातळीवर काम केले आहे. आता देश पातळीवर काम करत आहे. मी राज्याच्या भाजपच्या कोअर कमिटीत पण आहे, त्यामुळे मी राज्यातही सक्रिय आहेच.

मी आयुष्यीतील पहिले भाषण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केले होते. त्यांची हत्या झाल्यानंतर शाळेत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्यावर पहिले भाषण केले, अशी आठवण त्यांनी सांगितली. मुंडे साहेब भाषणाबद्दल माला नियमीत मार्गदर्शन करायचे, त्यांच्याकडे बघून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, असे त्यांनी सांगितले.     

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com