केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे योग्य होत्या; पंकजा मुंडेंच्या मनातील खदखद बाहेर 

माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला होता, हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला होता.
 Pritam Munde .jpg
Pritam Munde .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचे सांगितले. तर प्रीतम मुंडे यांचे नाव मंत्रिपदासाठी योग्य होते, असे त्या म्हणाल्या. (Pankaja Munde said that Pritam Munde's name was right for the post of Union Minister) 

प्रीतम मुंडे यांनी रेकॉर्डब्रेक मते मिळवून दोन टर्म खासदारकी जिंकूनही त्यांना का डावलले गेले, असे विचारताच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंसोबतची एक आठवण सांगितली. ही आठवण सांगताना त्यांचे डोळे पाणावले. गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच भाजपची आमदार होते. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला होता, हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला होता. प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. मात्र, आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्यांनी त्यांच्या मेरिटवर जिंकली. प्रीतम मुंडे यांना लोकसभेला तिकिट मिळणार की नाही, अशीही चर्चा रंगली होती. असेही त्यांनी सांगितले.

मत असते ते वैयक्तीक असते. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते आणि ते योग्य होते. त्या विक्रमी मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी चांगले काम केले, खूप हुशार आहेत. बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम त्यांनी डावललेला नाही. तरुण आहेत, महिला आणि बहुजन चेहरा होत्या. म्हणून त्यांचे नाव न येण्यासारखे काही नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. केवळ प्रीतम ताईंचेच नाव आले नाही असे नाही. पक्षाने मला फॉर्म भरायला लावला तेव्हाही मी पात्र आहे का असे विचारले होते. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात आहे. त्यामुळे निर्णय पटणे आणि न पटणे हा प्रश्न नसतो, असेही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, मंत्रिपद मिळालेल्या नवीन मंत्र्यांना एक दिवस आधी दिल्लीत बोलवले होते. रात्री १२ वाजता भागवत कराड यांचा मला फोन मला आला होता. त्यांनी सांगितले की मला पक्ष कार्यालयातून फोन आला आहे. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे. वंजारी समाजातील कोणीही नेता मोठा होत असले तर मला आनंदच आहे. मी त्यांच्या पाठीशी उभी राहील असेही पंकजा यांनी यावेळी सांगितले. ज्योतिरादित्य शिंदे यांना फोन करून मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. कपिल पाटील, भारती पवार यांनाही मी फोन केला. मी सगळ्यांशी बोलले आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. त्यामुळे नाराज असण्याचा काहीच संबंध नाही, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात कोणतेही पद देण्याची वेळ येते, तेव्हा मुंडेंचे नाव चर्चेत असते. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी माझेही नाव चर्चेत होते. अन्याय झाला असे समर्थक म्हणतात. त्यावर पंकजा म्हणाल्या, जनता एका नेतृत्वाला उभे करण्यासाठी कष्ट करत असते. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्याला काही मिळाले पाहिजे.

पक्ष वाढवण्यासाठी नवीन लोकांना संधी द्यावी लागते. नवीन-नवीन चेहरे आले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढले असे नेतृत्वाला वाटत असेल. मला माहिती नाही टीम देवेंद्र आणि नेरेंद्र मध्ये कोण आहे. पण भाजपला कोणतीही टीम मान्य नाही. मला पक्ष निष्ठा माझ्या बापाने शिकवली आहे. संजय राऊत यांना माझ्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी लिहिले ते त्यांचे मत आहे. प्रीतम मुंडे यांना लोकसभेचे तिकिट मिळणार आहे की नाही, याचीही चर्चा होती. मी आणि पक्ष वेगळे नाही. पक्षामध्ये नवीन लोक आले त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.      

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com