शपथविधीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता कराडांचा फोन आला होता... - Pankaja Munde said that Bhagwat Karad had called | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

शपथविधीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता कराडांचा फोन आला होता...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

पक्षासाठी पायाला फोड येई पर्यंत आम्ही काम केले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. त्यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने राज्यसभा खासदास आणि गोपीनाथ मुंडे यांचे जुने सहकारी भागवत कराड यांना राज्यमंत्री पद दिले. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी नाराज नसल्याचे सांगितले. (Pankaja Munde said that Bhagwat Karad had called) 

यावेळी त्यांनी भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्री पदाबाबात ही भाष्य केले. त्या म्हणाल्या की ''मंत्रिपद मिळालेल्या नवीन मंत्र्यांना एक दिवस आधी दिल्लीत बोलवले होते. रात्री १२ वाजता भागवत कराड यांचा मला फोन मला आला होता. त्यांनी सांगितले की मला पक्ष कार्यालयातून फोन आला आहे. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे. वंजारी समाजातील कोणीही नेता मोठा होत असले तर मला आनंदच आहे. मी त्यांच्या पाठीशी उभी राहील असेही पंकजा यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा : नाशिकच्या तिघा महिलांनी सांभाळले राज्य देशाचे आरोद्य!

ज्योतिरादित्य शिंदे यांना फोन करून मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. कपिल पाटील, भारती पवार यांनाही मी फोन केला. मी सगळ्यांशी बोलले आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. त्यामुळे नाराज असण्याचा काहीच संबंध नाही, असे त्या म्हणाल्या. पक्षासाठी पायाला फोड येई पर्यंत आम्ही काम केले. भाजपला मला संपवायचे आहे, असे नाही. मी इतकी मोठी नाही की पंतप्रधान मला संविण्यासाठी असे करतील. मी नाराज नाही, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. मात्र, यावेळी त्या गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले.    

महाराष्ट्रात कोणतेही पद देण्याची वेळ येते, तेव्हा मुंडेंचे नाव चर्चेत असते. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी माझेही नाव चर्चेत होते. अन्याय झाला असे समर्थक म्हणतात. त्यावर पंकजा म्हणाल्या, जनता एका नेतृत्वाला उभे करण्यासाठी कष्ट करत असते. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्याला काही मिळाले पाहिजे.     

प्रीतम मुंडे यांचे नाव योग्य होते. त्यांनी चांगले काम केले आहे. महिला आणि बहुजन चेहरा होता. कदाचीत पक्षाने काही निर्णय घेतला असेल. भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याची एक पद्धत आहे. नवीन-नवीन लोकांना संधी देण्यामध्ये काय हरकत आहे. नाराज असल्याच्या चर्चा आता थांबल्या पाहिजे. पक्षाने मला अर्ज भरायला लावला होता. आणी नंतर दुसऱ्याला तिकिट दिले. त्यावेळी सुद्धा मी नाराज नव्हते. मी मोठी नेता नाही. राजकारणात आले ते एक व्रत म्हणून आले. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मला राजकारणात यावे लागले. मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. मला फक्त वंजारी म्हणून बघणे चुकीचे आहे. वंजारी समाजातील कोणी माणूस मोठा होत असेल तर मी त्यांच्या मागे उभी राहणार आहे, असेही त्या म्हणाल्या. 

हेही वाचा :  प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत खरी कारणे!

पक्ष वाढवण्यासाठी नवीन लोकांना संधी द्यावी लागते. नवीन-नवीन चेहरे आले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढले असे नेतृत्वाला वाटत असेल. मला माहिती नाही टीम देवेंद्र आणि नेरेंद्र मध्ये कोण आहे. पण भाजपला कोणतीही टीम मान्य नाही. मला पक्ष निष्ठा माझ्या बापाने शिकवली आहे. संजय राऊत यांना माझ्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी लिहिले ते त्यांचे मत आहे. प्रीतम मुंडे यांना लोकसभेचे तिकिट मिळणार आहे की नाही, याचीही चर्चा होती. मी आणि पक्ष वेगळे नाही. पक्षामध्ये नवीन लोक आले त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.     

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख