पंकजा मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र..धनंजय मुंडेंवर निशाणा...

पंकजांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
1pankaja_20munde_dhananjay_20munde.jpg
1pankaja_20munde_dhananjay_20munde.jpg

बीड : राज्यात कोरोना महामारीची भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे, गेल्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात मृतांचा आकडा देखील वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

बीडमध्येही बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेडसह रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.  भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र ट्विट करताना पंकजांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

याबाबत पंकजा मुडेंनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाठविलेलं पत्र टि्वट केलं आहे. पंकजा आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की  #REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत.

राजेश टोपेंना पाठवलेल्या पत्रात पंकजा म्हणतात... 

बीड जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ असली, तरी त्यातील ३० हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे. आपणास विनंती आहे की, आपण यात जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे. तथापि याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे Vaccine उपलब्ध करुन द्यावेत आणि तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचित करावे.
Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com