पंकजा मुंडेंकडेच अखेर भाजपला नेतृत्व द्यावे लागले....

ओबीसी प्रश्नासाठी का होईना भाजपला त्यांची आठवण झाली, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Pankaja Munde.jpg
Pankaja Munde.jpg

पुणे : ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) निमीत्ताने भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याचे दिसत आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी २६ जूनला चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे ओबीसी प्रश्नासाठी का होईना भाजपला त्यांची आठवण झाली, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Pankaja Munde again active in state politics on the question of OBC reservation) 

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी आरक्षण टिकावे यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने आक्रोश मोर्चा सुरू केला. त्यांतर ओबीसी आरक्षणाबाबत शुक्रवारी (ता.१८ जून) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली. 

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्ननावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतरही भाजपच्या ओबीसी नेत्यांनी भेट कोणतीच भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे फडणवीस यांना हालचाली करून तातडीने बैठक घ्यावी लागली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrasekhar Bavankule) एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यांना उमेदवारीच नाकारली होती. त्यामुळे ओबीसी नेत्यांना भाजपमध्ये डावलले जात असल्याची भावना तयार झाली होती. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी प्रश्नासाठी का होईना पंकजा मुंडे यांची आठवण भाजपला झाली. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे भाजपच्या ओबीसी नेत्यांना चांगले दिवस येतील, असे बोलले जात आहे. 

पंकजा मुंडे या फडणवीस सरकारमध्ये मंत्री होत्या, मात्र, परळी विधानसभा मतदार संघात बहीण-भावात झालेली प्रतिष्ठेची लढाई राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. या लढाईतील पराभवानंतर पंकजा यांचे राजकारण संपविण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. पंकजा या भाजपच्या राज्यातील महत्त्वाच्या व ओबीसी नेत्या म्हणून त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल, अशी अपेक्षा असताना पक्षाने मात्र, त्यांच्याकडे राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी सोपविली, असली तरी त्यांना राज्याच्या राजकारणातून दुर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असेत. 

विधानसभा निवडणुकीपासून त्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रीय दिसल्या नाही. त्या राज्यातील राजकारणा पासून दूरच होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर त्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत. भाजप बॅकफूटवर जात असल्याचे दिसताच पंकजा यांची आठवण भाजपला झाली आणि तब्बल दीड वर्षानंतर त्या भाजपच्या स्टेजवर दिसल्या. राज्यातील ओबीसी समाज भाजपवर नाराज होत असल्याचे दिसल्यामुळे पंकजा मुंडे यांना बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Pankaja Munde again active in state politics on the question of OBC reservation) 

ओबीसींचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असलेल्या पंकजा यांना माननारा एक मोठा वर्ग आहे. सध्या राज्यात ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण हा विषय गाजत आहे. त्यामुळे या प्रश्नावर पंकजा यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाचे नेतृत्व भाजपने त्यांच्याकडे सोपविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेल्या आहेत. २६ जूनपासून राज्यात ओबीसी आरक्षणानिमित्त एल्गार सुरु होणार आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने त्या पुन्हा एकादा राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरल्या आहेत.  

पंकजा यांना मुंबईमध्ये स्वताःचे कार्यालय सुरु करायचे होते. मात्र, कोरोनामुळे ते सुरु झाले नाही. 3 जूनला गोपीनाथ गडावरुन केलेल्या भाषणात मुंडे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान एकदा आपल्याला पूर्णपणे भरायचे आहे, असे म्हटले होते. त्यांचे ते स्वप्न अजून अधुरेच आहे. दरम्यान, त्यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी एक दिवस आंदोलन केले होते, मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. आता त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे बैठका घेतल्या आहेत. अजून काही जिल्ह्यात त्या बैठका घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com