भाजपचे नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? - pandharpur bjp leadar kalyanrao kale on the path of ncp  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

भारत नागणे
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पंढरपूर : सोलापूरचे भाजप नेते सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज सरकोली (ता.पंढरपूर) येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि कल्याणाराव काळे एकाच मंचावर आले होते.

यावेळी कल्याणाराव काळे यांनी आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू असं जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काळेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चत असल्याचे मानले जात आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज सकाळी सरकोली येथे आले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती लक्षवेधून घेणारी होती. मागच्या काळात दुष्काळ आणि आर्थिक मंदीमुळे साखर कारखाने अडचणीत होते. त्यावेळी पवार साहेबांनी पंढरपूरच्या तिन्ही साखर कारखान्यांना मोठी मदत केली आहे. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहे.

आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत.

जाहीर सभेत कल्याण काळे यांनी आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काळेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. पवारांनी ही आपल्या भाषणात  कल्याणाराव काळे यांना विश्वासात घेवूनच  विठ्ठल कारखान्याची आर्धिक घडी नीट बसवू, असे सांगितल्याने तालुक्यातील राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

शरद पवार यांचे सूचक व्यक्तव्य..जून्या संवगड्यांना सोबत घ्यावे लागेल... 
पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कष्टातून उभारलेली पंढरपूर तालुक्यातील साखर कारखानदारी आज संकटात आहे. त्यामध्ये 'विठ्ठला'ची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. ती सुधारण्यासाठी सर्व जुन्या संवगड्या सोबत घेवून यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी येथील शेतकऱ्यांनी साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज केले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची आज सरकोली येथे भेट घेतली. त्यानंतर झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सूचक वक्तव्य केल्याने स्थानिक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आणि साखर कारखान्याच्या प्रश्ना संबंधीत केलेल्या कामाच्या अनेक आठवणी पवार यांनी सांगितल्या. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख