पंढरपूर : नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाच्या गाभाऱ्यात झेंडू, जरबेरा, शेवंती, गुलाब, गुलछडी अशा विविध प्रकारच्या 1 टन फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे. देवाचे प्रवेशद्वार, सोळखांबी, सभा मंडपात फुलांची तोरणे लावून मंदिर सजवले आहे.
नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. कोरोच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन बंद असून ऑनलाइन पास देवून मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिर समितीच्या वतीने दररोज 4800 भाविकांना पास देवून मुखदर्शनाची सोय केली आहे. आज नवीन वर्ष सुरू झाल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य भरातून अनेक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आळंदी येथील भाविक प्रदिप ठाकूर यांनी फुलांची मनमोहक आरास केली आहे.
महासंचालक पदासाठी सुरु आहे जोरदार लाॅबिंग#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/LglbEhcdbz
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 1, 2021
हेही वाचा : नव्या वर्षात राज्य सरकारला सद्बुद्धी मिळो : फडणवीस
अमरावती : नव्या वर्षात राज्य सरकारला चांगली कामं करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अपेक्षा असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या शहीद सैनिक आणि शेतकऱ्यांना मदत निधी वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. नव्या वर्षाचा आपला कुठलाही संकल्प नसून येणाऱ्या वर्षात राज्यावरची आणि देशावरची संकटं दूर व्हावी, हे वर्ष शेतकऱ्यांना सुख समाधानाचं जावो आणि चांगली कामं करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. उद्या एक जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेन्द्र फडणवीस पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत. त्याबाबत विचारले असता माध्यमांनी संकुचित बुद्धीने विचार करणे सोडावं अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली.

