मिनी विधानसभेच्या निकालांनी भाजपची झोप उडाली; अयोध्या, काशी, मथुरेत पराभव

या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे.
Up panchayat election results Bjp trails in Ayodhya kashi mathura district
Up panchayat election results Bjp trails in Ayodhya kashi mathura district

लखनऊ : उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या (UP Panchayat Election) निकालाने भाजपची झोप उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर आता उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीचे निकालही (Election Results) भाजपची चिंता वाढविणार ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या लोकसभा मतदारसंघासह मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांचा गड असलेले गोरखपुर, राम नगरी अयोध्या, काशी अन् मथुरेतही भाजपच्या विरोधात निकाल लागले आहेत.

या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांची ताकद दाखवणारी ठरणार आहे. या निवडणुकीचे निकाल भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहेत, असे चित्र आहे. रामनगरी अयोध्या मध्ये भाजपला 40 पैकी केवळ चार जागा मिळाल्या आहेत. 24 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर 12 जागांवर अपक्षांना विजय मिळाला आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. 

काशीमध्येही सपा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारासणी मतदारसंघातील भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. काशी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 40 पैकी केवळ 8 जागा मिळाल्या आहेत. तर समाजवादी पक्षाने 14 जागा जिंकत वर्चस्व मिळवले आहे. बसपाला पाच जागा मिळाल्या आहेत. 

मथुरेत बसपा

मथुरा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपला हार पत्करावी लागली आहे. इथे बहुजन समाज पक्षाने बाजी मारली असून त्यांचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय लोकदलाने आपले 8 उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला आहे. तर भाजपला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत. मथुरेत काँग्रेसचा सुफडा साफ झाला असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच निवडणुकीत पराभूत झाले आहेत. 

शेतकरी आंदोलनाचा फटका

उत्तर प्रदेशमधील पंयात निवडणुकीत भाजपला शेतकरी आंदोलनाचा फटका बसल्याचे दिसत आहे. बागपत, मथुरा या भागात भाजपचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. या भागात अजित सिंह यांच्या आरएलडीच्या उमेदवारांना पसंती मिळाली आहे. तसेच लखनऊ, वाराणसी, गोरखपुर, काशी, अयोध्या या जिल्ह्यांमध्येही भाजपला चमक दाखविता आलेला नाही.

मिनी विधानसभेत धक्का

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. त्यामुळे पंचायत निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहेत. पण या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. शेतकरी आंदोलनासह कोरोना संकटामध्ये लोकांचे झालेले हालही या निकालांना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. अद्याप निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले नसले तरी सुरूवातीचे कल भाजपची चिंता वाढवणारे आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com