Padalkar can't sleep anymore | Sarkarnama

फडणवीस-पाटील हेच पडळकरांचा बोलविते धनी... 

सुनील पाटील
रविवार, 28 जून 2020

शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना आता आम्ही अशा शिव्या देऊ की लाईकी नसणाऱ्या पडळकर यांना आता झोप लागणार नाही, अशा इशारा देत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 

कोल्हापूर : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हेच आमदार गोपिचंद पडळकर यांचे बोलविते धनी आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना आता आम्ही अशा शिव्या देऊ की लाईकी नसणाऱ्या पडळकर यांना आता झोप लागणार नाही, अशा इशारा देत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 

मुश्रीफ यांनी पडळकर यांना इशारा देताना एकेरी (अरे-तुरे) नावाचा उल्लेख करतच टिका केली. शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, गोपिचंद पडळकर यांनी पवार यांच्याबाबत वक्तव्य केले त्याचा निषेध आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गोपिचंद पडळकरांचे बोलवते धनी आहेत.

फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यामध्ये आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये असाच संदर्भ दिला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी पडळकर यांनी पवार यांच्याविरूध्द अपशब्द वापरणे हे निंदनीय आहे. त्यानंतर सोलापूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात पवार यांच्यावर केलेले विधान चुकीचे आणि पण पडळकर भावनेच्या भारात बोलल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात पडळकर यांने जे विधान केलेले आहे ते त्यांच्या काही तरी अनुभवावरुन केले असावे, असे सांगतात. 

वास्तविक राज्यात आजपर्यंत कोणावरही अशी विधान झालेली नाहीत. कितीही टोकाचा संघर्ष असला तरीही अशी चुकीची वाक्‍य आलेली नाहीत. 
राष्ट्रवादीमध्ये अशी व्यक्तव्य कोण करणार नाहीत. पण ज्यांनी केली त्यांची पवार यांनी पक्षातून हाकालपट्टी किंवा माफी मागायला लावली आहे. याउलट भारतीय जनता पार्टीचे लोक पडळकर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याऐवजी त्यांचे समर्थन करीत आहेत. महात्मा गांधींचे ज्यांनी खून केला त्या नथुराम गोडसेचे उध्दातीकरण जसे सुरु आहे. त्याच पध्दतीने या गोपिचंद पडळकरांचे (एकेरी नावाचा उल्लेख करत) उध्दातीकरण सुरु आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांचे रक्त सळसळले आहे. त्यामुळे आम्ही आता अशा ठेवणीतील शिव्या देवून रात्रभर त्यांना झोप येणार नाही. 

शिव्यांची पध्दत सुरु झाली 

विरोधी पक्षाने आता आम्ही त्यांना शिव्या देण्याचे लायसन्स दिले आहे. आता येथून पुढे ठेवणीतील शिव्या दिल्या जातील. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांना जबादार धरले जावे, असेही आवाहन मुश्रीफ यांनी केले. पडळकर यांना माफी मागायला लावायची दुरच पण त्यांना दुधाचा अभिषेक करा. त्याचे कौतुक करा ही कोणती भाषा असाही सवाल मुश्रीफ यांनी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उद्रेक होत असल्याचे त्यांनी नमुद केले. 

 

सरकार पाच वर्ष राहणार 

आघाडी सरकार पाच वर्ष भक्कम पणे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले किंवा बोलू देत सरकारला अजिबात धक्का बसणार नाही. नियती त्यांना साथ देणार नाही. आता त्यांना काही काम नाही, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही करत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख