चर्चा तर होणारच! ममता बॅनर्जी अन् सोशॅलिझम विवाह बंधनात अडकणार

सध्या देशभरात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
P Mamta Banerjee and Socialism wedding card goes viral in Tamilnadu
P Mamta Banerjee and Socialism wedding card goes viral in Tamilnadu

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West bengal) भाजपचा धुव्वा उडवत ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपने मोठी ताकद पणाला लावूनही ममतांना नमवता आलं नाही. त्यामुळं ममता बॅनर्जी हे नाव देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आलं. आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी नाव चर्चेत आलं आहे. पण यावेळी त्याचे कारण राजकारण नव्हे तर एक लग्न आहे. (P Mamta Banerjee and Socialism wedding card goes viral in Tamilnadu)

तमिळनाडूतील एक लग्न सध्या देशभर चर्चेचा विषय ठरलं आहे. वधूचं नाव पी. ममता बॅनर्जी आणि वराचं नाव ए. एम. सोशॅलिझम असं आहे. येत्या रविवारी सालेम जिल्ह्यात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. एका वृत्तपत्रात या दोघांच्या लग्नाची पत्रिका छापून आली असून ती वाचल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण हे खरं आहे. सालेम येथील कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ए. मोहन यांचा ए. एम. सोशलिझम हा मुलगा आहे. लग्नपत्रिका तमिळनाडूत व्हायरल झाली आहे.

ए. मोहन यांच्या दुसऱ्या दोन मुलांची नावं कम्युनिझम आणि लेनिनिझम अशी आहेत. त्यांच कुटूंब अनेक वर्षांपासून कम्युनिझमला मानणारे आहे. त्यांच्या कट्टूर या गावात बहुसंख्य लोक साम्यवादी विचारसरणीचे आहे. त्यामुळं मॅास्को, रशिया, रोमानिया यांसह लेनिन, मार्क्सवाद अशी नावं आहेत. या गावातील लोक देश, विचारसरणी व नेत्यांच्या नावावरून आपली नावं ठेवत असल्याने मोहन यांनीही तशीच नावं ठेवली आहेत. 

सोशॅलिझम यांचा विवाह होणारी मुलगी पी. ममता बॅनर्जीही मोहन यांचीच नातेवाईक आहे. तिच्या कुटूंब काँग्रेसचे समर्थक आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं. ममता बॅनर्जी याही पूर्वी काँग्रेसमध्येच होत्या. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत हे नाव ठेवण्यात आल्याचे मोहन यांनी सांगितले. आपल्या भावी पिढ्यांमध्येही अशीच नावे ठेवणार असल्याचेही ते सांगण्यास विसरले नाहीत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com