धक्कादायक ; ऑक्सफर्डच्या तिसऱ्या टप्यातील लशींची चाचणी थांबली... - Oxford third stage vaccine testing stopped | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक ; ऑक्सफर्डच्या तिसऱ्या टप्यातील लशींची चाचणी थांबली...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

ऑक्सफर्ड आणि 'अ‍ॅस्ट्राझेनेका' यांनी तयार केलेल्या कोरोनाच्या लशीवरील चाचणीस बंदी घालण्यात आली आहे.

लंडन : जगभर कोरोनाशी लढा देत असताना लस निर्मितीच्या प्रयत्नाला मोठा झटका बसला आहे. जगभरात तयार होत असलेल्या कोरोना लशीबाबत सर्वांना ही लस कधी बाजारात येते याबाबत उत्सुकता लागली आहे. अशा परिस्थितीत ऑक्सफर्ड आणि 'अ‍ॅस्ट्राझेनेका' यांनी तयार केलेल्या कोरोनाच्या लशीवरील चाचणीस बंदी घालण्यात आली आहे. या लशीची चाचणी करण्यात मनाई करण्यात आली आहे. या लशीची चाचणी तिसऱ्या टप्यात होती. सध्या मानवी चाचणी सुरू होती. ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि 'अ‍ॅस्ट्राझेनेका'ची लस मानवी चाचणीत समावेश असलेला व्यक्ती आजारी पडल्यामुळे या लसीची चाचणी सध्या थांबवण्यात आली आहे. जगातील अन्य लशीच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर होती.  

ऑक्सफर्ड आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी 'अ‍ॅस्ट्राझेनेका' (AstraZeneca) यांनी तयार केलेल्या या लसीला एझेडडी -1222  (AZD1222) असं नाव दिले आहे. मानवी चाचणीत ज्या व्यक्तीवर करण्यात आली, त्या व्यक्तींवर याचा गंभीर परिणाम झाला असल्याने लशींवर बंदी घालण्यात आली आहे. भारतातही या लशीची चाचणी सुरू होती. 
 
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की,  अशा प्रकारणच्या मोठ्या चाचणीत एखादी व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुध्दा आजारी व्यक्तीची स्वतंत्र तपासणी करणे फार महत्वाचे आहे. ती व्यक्ती लवकर बरी होईल, अशी अपेक्षा आहे. 'अ‍ॅस्ट्राझेनेका' कंपनीने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'हे एक नियमित व्यत्यय आहे, चाचणीत सहभागी झालेला व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही, असे 'अ‍ॅस्ट्राझेनेका' आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आला होता. या काळात नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांमध्ये  मोठी वाढ झाली आहे. आजपर्यंत देश म्हणून मानसिक आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान घेण्यात आलेल्या काही सर्वेमधून हि बाब समोर येत आहे. डोकेदुखी, चिंता, अनिश्चितता आदी मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. द सुसाईड परिव्हेन्शन इन इंडिया फाउंडेशन आणि इंडियन सायकेट्रिक सोसायटीच्या वतीने नुकतेच यासंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख