आमचे सरकार जरूर पाडा; पण पहिले तुमचे सरकार सांभाळा : ठाकरेंचे भाजपला आव्हान 

आपल्याशी खेळ करायले गेले तर आपण तडाखा दिला.
Our government must fall; But first take care of your government: Thackeray's challenge to BJP
Our government must fall; But first take care of your government: Thackeray's challenge to BJP

मुंबई : तुमच्या मित्रपक्षाचा जर पाया हलला असेल, पायाचे दगड निसटतील असतील तर विचार, आचार, संस्कृती नसलेले सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. आमचे सरकार कधी पाडायचे त्या वेळी पाडा, असे माझे आव्हानच आहे. पण तुमचं सरकार पहिले सांभाळा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकेकाळी आपला मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला दिले. 

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांनी विविध मुद्यांची मांडणी करत प्रामुख्याने भाजपवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले की चीनने अतिक्रमण केल्यानंतर आपण काय करायचे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी आम्ही सर्वांनी युद्धाच्या वेळी राजकारण करायचं नाही, असे सांगून आपण निर्णय घ्या, त्याच्या पाठीशी आम्ही राहू, असे सांगितले होते. आणि तुम्ही मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात राजकारण करता? राज्यातील मंदिरे उघडण्यावरून राजकारण केले जाते. माझ्यावर टिका केली जाते, हे कसलं राजकारण?, असा प्रश्‍न ठाकरे यांनी केला. 

राज्यातील मंदिरं काय सर्व काही हळूहळू आम्ही उघडणार आहोत. पण तुम्ही काय केलं. करून दाखवलं म्हणे. काय केलं तर ह्यांनी टाळेबंदी करून दाखवली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

आमचे हिंदुत्व हे तुमच्याएवढे संकुचित नक्कीच नाही. आज सकाळी सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी काय सांगितले त्यांचे ऐका जरा. त्यांच्या शिकविण्याकडे लक्ष न देता, जर तुमचं लक्ष खुर्चीवर असेल, तर तुमच्या खुर्चीचे पाय विचार पक्का नसल्याने कधी कापले जातील, हे सांगता येत नाही. पाया मजबूत पाहिजे. आज एनडीए पूर्णपणे तुटून गेली आहे. पूर्वीची एनडीए आता राहिली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

आपल्याशी खेळ करायले गेले तर आपण तडाखा दिला. यशाचे शिखरे पादाक्रांत करताय. जरूर करा. दहीहंडी फोडायला वरती गेले आहेत. पण वरती गेल्यावर तारेवर लटकू नका. कारण खालचे सगळे गेले, परत येणार कसे खाली? हंडी आणि तुम्ही दोघं खाली.

दहीहंडी फोडतानाही पाया मजबूत असावा लागतो. तो जर तुमच्या मित्रपक्षरूपी पाया हलला असेल तर पायाचे दगड निसटतील असतील तर विचार, आचार, संस्कृती नसलेले हे भाजपचे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. आमचे सरकार कधी पाडायचे त्या वेळी पाडा, असे तुम्हाला माझे आव्हान आहे. पण तुमचं सरकार पहिले सांभाळा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिले.  

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com