आपल्याच आमदारांना हे सरकार घाबरतेय..फडणवीसांचा हल्लाबोल..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
1devendra_20Fadnavi_Uddhav_20Thackeray.jpg
1devendra_20Fadnavi_Uddhav_20Thackeray.jpg

मुंबई : 'या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. तरीही सरकार घाबरतेय का... आपल्याच आमदारांना एवढं घाबरणार सरकार माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिले,' अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.   

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले की याबाबत नियमावली आहे. या नियमावलीमध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे. राज्यपाल ठरवितात की विधानसभा अध्यक्षांची निवडणूक कधी घ्यायची याबाबत राज्यपाल ठरवितात. त्यांनी पत्र लिहिलं आहे. राज्यपाल त्यांची तारीख ठरवितात. पण त्यांनी सरकारला मुभा दिली आहे. नियमानुसार  गुप्त मतदान पद्धतीनं अध्यक्षांची निवड होते.  पण या सरकारला आपल्याच आमदारांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना असं वाटतं आपलं सरकार पडतं की काय, आपला अध्यक्ष पडतो का, असी भीती सरकारला वाटते.  

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना विसर पडला असल्याची टीका होत आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट आणि शुटिंग बंद पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

प्रसिद्धी करीता नाना पटोले असे स्टेंटमेंट देतात. अभिनेत्यांना बोललं की आपसूकच प्रसिद्धी मिळते. त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याचं कारण नाही, 'बदनाम हुवा तो क्या हुवा नाम तो हुवा,' असे नाना पटोले यांना वाटत असावे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.   
 
नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज प्रथमच भंडारा जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले. यावेळी कार्यकत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करुन जेसीबीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे किंवा त्याचे शूटींग आता आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड प्रकरणाबाबत फडणवीस म्हणाले की सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व पुरावे असताना कारवाई करीत नाही. या सरकारकडे बहुमत आहे, तरीही सरकार घाबरते. हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत आहे. सरकार बिल्डरांना 5 हजार कोटींची सूट देते, पण शिक्षकांना अनुदान देत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com