राज्य सरकारचा एकमेव धंदा.."बदल्या करा आणि माल कमवा" फडणवीसांचा आरोप - The only business of the state government Transfer and earn money Fadnavis alleges  | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारचा एकमेव धंदा.."बदल्या करा आणि माल कमवा" फडणवीसांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

काँग्रेसला या सरकारमध्ये स्थानच नाही. ते बळजबरीने बसले आहेत. सध्या बदल्या करा आाणि माल कमवा असा एकमेव धंदा या सरकारचा सुरू आहे," अशी टीका माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नागपूर : "महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसला या सरकारमध्ये स्थानच नाही. ते बळजबरीने बसले आहेत. सध्या बदल्या करा आाणि माल कमवा असा एकमेव धंदा या सरकारचा सुरू आहे," अशी टीका माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी फडणवीस नागपुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

फडणवीस म्हणाले,  " सध्या जो भगवा दिसतोय तो बाळासाहेबांचा भगवा नाहीच. बाळासाहेबांचे हिंदुत्व खरे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह लेखन करणाऱ्यांसोबत ते सत्तेत बसले आहेत. काश्मीरच्या गुपकार संघटनेत सहभागी असलेल्या काँग्रेसची साथ घेणारी शिवसेना आम्हाला काय सांगणार.."

वाढीव वीज बिलाबाबत फडणवीस म्हणाले, "आधी वीजमाफीची घोषणा केली आणि आता तोंडावर पडले. हे अपयश लपवण्यासाठी सरकार थकीत बिलाच्या चौकशीची भाषा बोलत आहे. जी थकबाकी होती ती त्यांच्या काळातीलच होती. उलट आम्ही शेतकऱ्यांना आणि मागासवर्गीयांना वीज उपलब्ध करून दिली."

हेही वाचा : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा  

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कार्तिकी सोहळा यंदा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होणार  आहे.  
येत्या 26 नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. ता. 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रा रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव पंढरपूर मंदिर समितीने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला होता, शासनाकडून त्याला मान्यता मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.  या शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी एसटीची वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालख्या आणि दिंड्याना यात्रा काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहर व परिसरातील सुमारे 350 मठ बंद ठेवण्यात येणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख