मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच राम मंदिरासाठी एक कोटीचा निधी.. - One crore fund for Ram Mandir on Chief Minister's birthday .. | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच राम मंदिरासाठी एक कोटीचा निधी..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी एक कोटी रुपयांचा निधी राममंदिर ट्रस्टला दिला असल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली.

मुंबई : राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी एक कोटी रुपयांचा निधी राममंदिर ट्रस्टला दिला असल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली. ही रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा झाली असल्याचे  देसाई यांनी सांगितले.  

२७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दान ट्रस्टकडे जमा केल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला गेल्यानंतर शिवसेनेने राम मंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचे राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले होते.

२८ तारखेला हे पैसे जमा झाल्याची पोहोच आली, असा दावाही त्यांनी केला असून, महंत यांनी याविषयीची माहिती त्यांच्या सहकाऱ्याकडून घ्यावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असून, ५ ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 
Edited  by : Mangesh Mahale 

हेही वाचा : ठाकरे सरकार पाच वर्षे टिकणारच, थोरातांचे राज ठाकरेंना उत्तर
 
मुंबई : महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे राज ठाकरे म्हणतात.मात्र ते कशाच्या आधारे ही भविष्यवाणी करतात,असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. एकीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही ठाकरे सरकारवर टीका करीत असतात. आपआपसातील मतभेदामुळे हे सरकार कोसळेल असे ते सांगत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेविषयी आशावादी आहेत. मात्र जे फडणवीस सांगत आहेत ते आता राज ठाकरेही सांगत आहे. हे सरकारच टीकणार नाही असा त्यांचा दावा आहे. राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार थोरात यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की ठाकरे सरकार आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल,असा मला आत्मविश्वास आहे. सरकार जास्त काळ टिकणार नाही. अशी भविष्यवाणी राज ठाकरे हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख