नवी दिल्ली : ओबींसींची स्वतंत्र्य जनगणनेची मागणी होत असतानाच आता ओबीसी आरक्षणासाठी क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत केंद्र सरकार गांर्भीयाने विचार करीत आहे. मंगळवारी संसदेत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. क्रिमीलेयरची सध्याची मर्यादा 8 लाख आहे, केंद्र सरकार ही मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत द्रमुकचे खासदार टीआर बालू यांनी सरकारकडे प्रश्न विचारला होता. यावर समाज कल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की ओबीसी गटातील क्रिमीलेयर निर्धारणासाठी प्राप्तिकर मर्यादेच्यावर मुद्द्यावर आढावा घेण्यात येत आहे.याबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाशी चर्चा करत आहे.
या नव्या प्रस्तावात क्रिमीलेयरच्या श्रेणीत येण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढविली जाऊ शकते. मोठ्या वर्गाला याचा फायदा होईल. गेल्या वर्षी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटले होते की, सरकार ओबीसीमध्ये क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा वाढवणार आहे.
अनिल देशमुख काटोलमधून गायब : पुतण्याची टीका https://t.co/eB0kTZzVOC #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews #AnilDeshmukhNCP #AshishDeshmukh #JayantPatil #KatolNagpur
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 3, 2021
दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रतन लाल कटारिया म्हणाले की, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग प्रवर्गातील रिक्त सरकारी जागा का भरल्या जात नाहीत याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. समितीकडून याबाबत सूचनाही मागवण्यात आल्या होत्या.
केंद्रीय शैक्षणिक संस्था आणि नोकरीत सध्या ओबीसी प्रवर्गात जे क्रिमीलेयरमध्ये येत नाहीत अशांना 27 टक्के लाभ मिळतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, असे सर्व क्रिमीलेयरमध्ये येतात. अशांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. असे म्हणता येईल की, क्रीमीलेयरमध्ये असणारे ओबीसी प्रवर्गात असतात, परंतु आर्थिकदृष्ट्या संपन्नही असतात.
हेही वाचा : भाजपच्या नेत्यांना या गावात बंदी..
नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उकरून आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारविरूद्ध शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र होत आहेत. याच पार्श्वभूमीवर हरयाणामध्ये दादरी जिल्ह्यातील चरखी गावात गावकऱ्यांनी भाजप आणि उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या जजपाच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. याबाबतचे फलक गावकऱ्यांनी वेशीवर लावले आहेत. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करुन नये असा इशारा फलकावर देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी फोगट खाप येथीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजप आणि जजपाच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

