गृहमंत्री अमित शहा हरवले; दिल्ली पोलिसांत तक्रार

रुग्णांना अॅाक्सीजन, औषधांचा पुरवठा करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत.
NSUI filed missing report against Home Minister Amit Shah
NSUI filed missing report against Home Minister Amit Shah

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच असून केंद्र सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. तसेच रुग्णांना अॅाक्सीजन, औषधांचा पुरवठा करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक बाबींचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. देशातील सर्व सरकारी यंत्रणा या कामात गुंतल्या आहेत. अशातच आता दिल्ली पोलिसांत गृहमंत्री अमित शहा हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे. (NSUI filed missing report against Home Minister Amit Shah)

राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन अॅाफ इंडियाचे (NSUI) सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांकडे अमित शहा हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीविषयी बोलताना ते म्हणाले, 'संकटाच्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी देशाची सेवा करणे, लोकाच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. अशा काळात या जबाबदारीपासून पळून जाऊ नये.'

दरम्यान, NSUI चे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते लोकेश चुघ यांनी दावा केला की, तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलीस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी NSUI च्या कार्यालयात आले होते. चुघ म्हणाले, '२०१३ पर्यंत राजकारणी नागरिकांप्रती जबाबदार होते. पण त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर हे चित्र पुर्णपणे बदलले. आता पंतप्रधानांतर सर्वात महत्वाची व्यक्ती असलेले गृहमंत्री महामारीच्या काळात हरवले आहेत. '

'सध्या आपण भायनक महामारीचा सामना करत आहोत. या काळात सरकारने नागरिकांना मदत करण्याची गरज आहे. ते त्यांचे उत्तरदायित्व आहे. सध्या सरकार हे करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता आम्ही सरकार काय पावले उचलते, याची वाट पाहत आहोत,' असे चुघ यांनी सांगितले. 

मृत्यूचे तांडव सुरूच 

देशामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी २४ तासांत पुन्हा ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा २ लाख ५८ हजार ३१७ वर पोहचला आहे. तर नव्याने ३ लाख ६२ हजार ७२७ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटी ३७ लाख ३ हजार ६६५ पर्यंत वाढला आहे. बुधवारपर्यंत देशात ३७ लाख १० हजार ५२५ सक्रीय रुग्ण होते. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १५.६५ टक्के एवढे आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com