कोरोनाने मेलेली माणसं जगण्यासाठी लायक नव्हती..भिडेंची मुक्ताफळे (व्हिडिओ)

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कोरोनाने मेलेली माणसं जगण्यासाठी लायक नव्हती..भिडेंची मुक्ताफळे (व्हिडिओ)
2sambhaji_20bhide_7.jpg

सांगली :  ''कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे'', असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे  यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते सांगलीत बोलत होते. ''कोरोनाने मेलेली माणसं जगण्यासाठी लायक नव्हती,'' असे भिडे म्हणाले.

संभाजी भिडे म्हणाले की, कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकर जबाबदार आहेत. हातावरचे माणस उध्वस्त होत आहे. शिक्षण क्षेत्र उध्वस्त झाले आहे. लॉकडाउनची गरज नाही. त्यामुळे व्यसन वाढत आहेत.

गांजा, अफू, दारू दुकाने वाढत आहेत. कोरोना हा भंपक आणि बावळट रोग आहे. सरकारने लोकांच्या वर सोडून द्यावे. गांधी आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे, असे भिडे म्हणाले.

पुणे जिल्ह्यात  ८४ हजार सक्रिय कोरोना रुग्ण
 पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी (ता.७) ८४ हजार ५२६ झाली आहे. यापैकी १९ हजार ९०७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ६४ हजार ६१९ गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आज दहा हजार ९०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ६५१ रुग्ण आहेत.गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक ४१ मृत्यू आहेत. दिवसभरात ७ हजार ८३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४ हजार ३६११, पिंपरी चिंचवडमधील २ हजार २५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७०४, नगरपालिका हद्दीतील ४६२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४८ रुग्ण आहेत.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in