आमच्यात सर्व आलबेल..मागच्या सरकारसारखी नळावरील भांडणे नाहीत.पटोलेंचे स्पष्टीकरण.. 

सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
2Nana_20Patole_0.png
2Nana_20Patole_0.png

मुंबई : . राज्यात कॅाग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे.  काँग्रेसचे सरकारमधील स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात.  काल कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी महाविकास आघाडी सरकारमधील कॅाग्रेसचे स्थान यावर आपले मत मांडले होते. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. no dispute in the mahavikas aghadi government said nana patole

शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी काल पटोलेंना काँग्रेसशिवाय सरकार असल्याची शंका का यावी," असा प्रश्न उपस्थित  केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे, मागच्या सरकारसारखी नळावरची भांडणे नाहीत, असे पटोले यांनी म्हटलं आहे. पटोले म्हणाले की काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत. 

संजय राऊत यांच्याबाबत पटोले म्हणाले की, राऊत आणि माझं वैयक्तिक वैर नाही. सरकारमधील प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलेला नाही, असं पटोले म्हणाले. UPA च्या अध्यक्षपदावरुन संजय राऊत आणि काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झडलेली होती. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

"आम्ही हे सरकार बनवताना आघाडीवर होतो. सुरुवातीपासूनच आमच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धवजी किंवा अन्य नेते असतील त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेले नाही," असे राऊत म्हणाले होते. 

पटोले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॅाग्रेसचे स्थान याबाबत अनेकदा जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. असेच विधान पटोलेंनी नुकतेच केले.  यावर  संजय राऊत  यांनी पटोलेंना उत्तर दिलं. पटोले आणि राऊत यांचे नेहमीचं शाब्दीक युद्ध रंगत आहे.  महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यामधील अनेक विषयांवरुन मतभेद आहेत. हे मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. राज्यात कॅाग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे.  काँग्रेसचे सरकारमधील स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात.  
 
राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान याविषयी बोलताना नाना पटोलेंनी सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका नुकतीच मांडली. याआधीही अनेकदा आम्ही सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही. तेच आमच्या नेत्यांनीही सांगितले आहे. सरकारमध्ये आमची खूप सारी भागीदारी नाही. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत आमचे नाते जोडले गेले असल्याचे पटोलें म्हणाले होते.

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले यांना काँग्रेसशिवाय सरकार असल्याची शंका का यावी. आम्ही हे सरकार बनवताना आघाडीवर होतो. सुरुवातीपासूनच आमच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धवजी किंवा अन्य नेते असतील त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेले नाही.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com